काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात १२ वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये १० वी चा देखील निकाल जाहीर केला जाणार आहे. १०वी आणि १२वीच्या परीक्षांमध्ये गुण मिळवणारे विद्यार्थी सध्या नैराश्याचे बळी ठरत आहेत. परीक्षांमध्ये(Exam) कमी गुण मिळाल्यामुळे मुले निराश होत आहेत. १०वी आणि १२वीच्या गुणांच्या आधारांवर मुले स्वतःला जीवनात अयशस्वी ठरवू लागले आहेत. (District collector tushar sumera 10th marksheet viral )
यादरम्यान आपल्याला अनेक अशी प्रेरणादायी उदाहरणे पाहायला मिळतात, ज्यांनी १० वीच्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये जेमतेम गुण मिळवले होते. पण पुढील जीवनात ते खूप यशस्वी झाले. असेच एक उदाहरण गुजरातमधील भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांचे आहे. नुकतंच IAS अधिकारी अवनीश शरण यांनी त्यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये IAS अधिकारी अवनीश शरण यांनी लिहिले आहे की, “भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांनी सोशल मीडियावर दहावीची मार्कशीट शेअर करताना लिहिले आहे की त्यांना दहावीत फक्त उत्तीर्ण गुण मिळाले आहेत. त्यांना इंग्रजीमध्ये १०० पैकी ३५, विज्ञानमध्ये ३८ आणि गणित विषयात केवळ ३६ गुण मिळाले आहेत. ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत, असे त्यावेळी गावातील लोक आणि शाळेतील शिक्षक म्हणत होते.”
भरूच के कलेक्टर तुषार सुमेरा ने अपनी दसवीं की मार्कशीट शेयर करते हुए लिखा है कि उन्हें दसवीं में सिर्फ पासिंग मार्क्स आए थे.
उनके 100 में अंग्रेजी में 35, गणित में 36 और विज्ञान में 38 नंबर आए थे. ना सिर्फ पूरे गांव में बल्कि उस स्कूल में यह कहा गया कि यह कुछ नहीं कर सकते. pic.twitter.com/uzjKtcU02I
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) June 11, 2022
या ट्विटसोबत IAS अधिकारी अवनीश शरण यांनी भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांचे १० वीचे मार्कशीट देखील शेअर केले आहे. ता ट्विटवर भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांनी आभार मानले आहेत. IAS अधिकारी अवनीश शरण यांनी केलेल्या ट्विटला आतापर्यंत १२ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.
Thank You Sir https://t.co/MFnZ7vSICz
— Tushar D. Sumera,IAS (@TusharSumeraIAS) June 11, 2022
तसेच २२०० हून अधिक लोकांनी हे ट्विट री-ट्विट केले आहे. गुजरातमधील भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांच्या कामाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केले होते. भरुच जिल्ह्यामध्ये ‘उत्कर्ष पहल’ अभियानांतर्गत जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांनी जोरदार काम केले होते. या कामाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले होते.
गुजरातमधील भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांना दहावीत जेमतेम गुण मिळाले होते. पण UPSC सारख्या कठीण परीक्षेत त्यांनी यश मिळवले आणि IAS अधिकारी झाले. भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांचे ट्विट करणारे IAS अधिकारी अवनीश शरण सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहेत. IAS अधिकारी अवनीश शरण यांचे ट्विटरवर ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
सलग दुसऱ्या पराभवनंतर कर्णधार ऋषभ पंत झाला लालबुंद, ‘या’ खेळाडूंवर काढला सगळा राग
साहेब, तुम्ही माझ्यावर खुप अन्याय केला अन्…, शाहरूखनंतर आर्यननेही एनसीबीवर लावले गंभीर आरोप
पुन्हा सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीने भावूक झाली क्रिती सेनन म्हणाली, मला आनंद आहे की…