एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थान सोडले आहे.(District Chief supports Uddhav Thakre)
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. यादरम्यान शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शिवसैनिकांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निदर्शने केली आहेत. सोलापूरमध्ये देखील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा दिला आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना मान्यच असेल. आम्ही सरकारचे नव्हे तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, असे जिल्हाप्रमुखांनी सांगितले आहे. ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की माझ्या मागे उद्धव आणि आदित्यला सांभाळा’, या वक्तव्याची आठवण यावेळी जिल्हाप्रमुखांनी करून दिली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वायकर, धनंजय डिकोळे आणि संभाजी शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख म्हणाले की, “शिवसेनेच्या इतिहासात अनेकांनी पक्ष सोडला आहे. छगन भुजबळ, राज ठाकरे, गणेश नाईक, नारायण राणे या नेत्यांनी पक्ष सोडला. त्यामुळे पक्षाला काहीच फरक पडणार नाही”, असे जिल्हाप्रमुखांनी सांगितले आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुढे म्हणाले की, “एकनाथ शिंदे पक्ष सोडणार नाहीत, तरीही एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचा शिवसेनेवर परिणाम होणार नाही. शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर भक्क्कम उभी आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की माझ्या मागे उद्धव आणि आदित्यला सांभाळा”, असे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी सांगितले आहे.
शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण गुवाहटीमधील रेडिसन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘या’ आजोबांनी करोडोंच्या संपत्तीवर सोडलं पाणी, सर्व सोडून एकटेच राहतायत बेटावर, कारण..
बाळासाहेबांची सेना म्हणाणारे एकनाथ शिंदे स्थापन करणार नवा पक्ष? ‘हे’ आहे नव्या पक्षाचे नाव
उद्धव ठाकरेंसाठी ममता बॅनर्जी मैदानात? गुवाहाटीतील हॉटेलवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांची धडक