जिल्हाबंदी १० जूननंतर उठणार, तर १ जूनपासून ५० टक्के कार्यालये सुरू होण्याची शक्यता

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागलेचआहेत यामुळे आता लॉकडाऊनमध्ये सूट मिळण्याची शक्यता आहे. अनेकांनी आता तरी लॉकडाऊन शिथिल करा अशी मागणी केली आहे. यामुळे आता सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सध्याची कोरोनाची रुग्णसंख्या बघता १० जूनपर्यंत सध्याचे लॉकडाऊन ठेवण्याची चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली होती. मात्र पूर्णपणे लॉकडाऊन उठणार नसल्याचे देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. ग्रामीण भागात अजूनही रुग्णसंख्या वाढत आहे.

आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्यावर निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हाबंदी ही १० जून नंतरच उठण्याची शक्यता आहे. यामुळे आता १० जूनपर्यंत तरी हे नियम लागू असणार आहेत.

असे असले तरी १ जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालय ५० टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे जूनमध्ये दैनंदिन व्यवहारा सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे लवकरच लॉकडाऊनमध्ये लवकरच सूट मिळण्याची शक्यता.

तसेच पुणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुविधांवर असलेली बंधने काढून टाकली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. रेड झोनमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्या पुण्यातील परिस्थिती समाधानकारक असल्याचे टोपे म्हणाले.

पुण्याची रुग्णसंख्या ही देशात सर्वाधिक जास्त रुग्णसंख्या होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा आकडा कमी झाला आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. हळूहळू आता लॉकडाऊनमध्ये सूट दिली जाणार आहे. असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

ममतांनी केला मोदींचा अपमान; अर्धा तास वाट बघायला लावली अन् पाच मिनीटांत बैठक सोडली

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधील साध्या आणि सोज्वळ लतिकाचे हे फोटो पाहून विश्वास बसनार नाही

मुलाने होकार देताच लग्नाळू नवरी झाली वेडी, केला होणाऱ्या नवऱ्याला किस; व्हिडीओ व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.