भारीच! पालिकेनं तयार केली ‘मास्क बँक’; मिळणार मोफत मास्क

मुंबई | देशात कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरूच आहे. कोरोनावरील लस अजूनही बाजारात आलेली नाहीये. त्यामुळे आपण सध्या मास्कच्या मदतीने घराबाहेर पडत आहोत. सुरक्षित अंतर, स्वच्छता पाळून आपण सर्वजण कोरोना विषाणूशी लढा देत आहोत.

तर दुसरीकडे अनेक ठिकाणी मास्कचे मोफत वितरण केले जात आहे. मध्य दिल्लीतील सदर बझार भागात मास्क बँक स्थापन करण्यात आली आहे. ज्यांना कोणाला मास्कची गरज आहे, त्यांना या बँकेतून मोफत मास्क मिळणार आहे. तसेच ज्यांना मास्क दान करायचे आहेत, ते ही इथे आणून देऊ शकतात.

तसेच उत्तर दिल्लीचे महापौर जय प्रकाश यांच्या हस्ते बुधवारी या बँकेचे उद्घाटन करण्यात आले, अशी माहिती एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली पोलीस आणि उत्तर दिल्ली महापालिका यांच्या सहकार्याने बारह तुती चौकात ही मास्क बँक स्थापन करण्यात आली आहे.

दरम्यान, ‘मास्क नसेल तर दोन हजार रुपये दंड आहे. गरीब कामगारांना इतका दंड भरणं शक्य  होत नाही.  त्यामुळे मोफत मास्क पुरवण्याच्या उद्देशाने उत्तर दिल्ली महानगर पालिका आणि दिल्ली पोलिस यांच्या संयुक्त विद्यमानं ही मास्क बँक स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोनाविरोधात आणखी एक शस्त्र तयार…
मास्क, सॅनिटायझरनंतर आता कोरोनाविरोधात आणखी एक शस्त्र तयार करण्यात आले आहे. बर्मिंघम युनिव्हर्सिटीने हे अँटी-कोव्हिड नेझल स्प्रे तयार केले आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, हा नेझल स्प्रे दोन प्राथमिक मार्गाने काम करतो. प्रथम तो नाकाच्या आत विषाणूला पकडतो आणि त्याच्याभोवती नाकातच वेष्टन तयार करतो.

दरम्यान, स्प्रेमध्ये वापरलेलं सोल्युशन कोरोनाचा संसर्ग परसरवणाऱ्या सेल कल्चरला ४८ तासांपर्यंत रोखून ठेवते, असे संशोधकांनी सांगितले. याचबरोबर संक्रमित व्यक्तीच्या शिंकण्या किंवा खोकल्याद्वारे दुसऱ्याकडे प्रसारित झाला तरीही त्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
सावधान! अनेक कोरोना रुग्णांमध्ये उद्भवतेय ‘ही’ भयंकर समस्या; मृत्यूचाही धोका
कोर्टाला काही वाईट बोललं तर तो अवमान मग मुंबई महाराष्ट्राला बोललं तर ती बदनामी नाही का?
कोरोना विषाणूचा जन्म भारतात, तिथूनच जगभरात पसरला; चीनचे संशोधक बरळले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.