कोरोना लस प्रत्येकापर्यंत पोहचवण्यासाठी मोदी सरकारने तयार केला प्लॅन; जाणून घ्या..

मुंबई | सर्वांचे लक्ष कोरोना लसीकडे लागले आहे. दिलासादायक बाब म्हणजे फायजर, मॉडर्ना, ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका, स्पुटनिक व्ही या लसी शेवटच्या टप्प्यात आहेत. यामुळे आता लवकरच कोरोना लस बाजारात येईल अशी माहिती मिळत आहे.

कोरोना लस वेळेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आरखडा तयार करण्याच्या तयारीत आहे. सरकार प्रत्येक राज्यात ब्लॉक स्तरावर ब्लॉक टास्क फोर्स तयार करेल. याबाबत बुधवारी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

या टास्क फोर्सच्या मदतीने प्रत्येक भागात कोरोना लस पोहचवायला मदत होईल. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून ब्लॉक टास्क फोर्स बनवण्याची सूचना दिल्या आहेत.

या फोर्समध्ये एसडीएम, तहसीलदार यांच्याव्यतिरिक्त स्थानिक विना सरकारी संघटना म्हणजेच एनजीओ, विभागातील प्रभावी व्यक्ती आणि धार्मिक नेत्यांना सहभागी करुन घेतले जाईल. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
संजय राऊतांनी ईडी आणि सीबीआयला दिली कुत्र्याची उपमा; पहा नेमकं काय म्हणाले..
#coronavirus : ‘या’ नियमांसह राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला
‘मुख्यमंत्र्यांची सामनातील मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्याही लायकीची नाही’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.