मुंबई | देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु आहे. अशातच सर्वांचे लक्ष कोरोना लसीकडे लागले आहे. दिलासादायक बाब म्हणजे फायजर, मॉडर्ना, ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका, स्पुटनिक व्ही या लसी शेवटच्या टप्प्यात आहेत. यामुळे आता लवकरच कोरोना लस बाजारात येईल अशी माहिती मिळत आहे.
तर दुसरीकडे कोरोना लस वेळेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आरखडा तयार करण्याच्या तयारीत आहे. सरकार प्रत्येक राज्यात ब्लॉक स्तरावर ब्लॉक टास्क फोर्स तयार करेल. याबाबत बुधवारी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
तसेच या टास्क फोर्सच्या मदतीने प्रत्येक भागात कोरोना लस पोहचवायला मदत होईल. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून ब्लॉक टास्क फोर्स बनवण्याची सूचना दिल्या आहेत.
कोण – कोण असणार ब्लॉक टास्क फोर्समध्ये…
या फोर्समध्ये एसडीएम, तहसीलदार यांच्याव्यतिरिक्त स्थानिक विना सरकारी संघटना म्हणजेच एनजीओ, विभागातील प्रभावी व्यक्ती आणि धार्मिक नेत्यांना सहभागी करुन घेतले जाईल. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
एबीपी माझा पुन्हा वादात; ‘या’ नेत्याने केला खोटी बातमी दिल्याचा आरोप; माफीची मागणी
कंनगा राणावतबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, सोडून द्या..
‘आमचं काय आज आहे तर उद्या नाही’, शहीद जवानाचा अखेरचा संवाद वाचून डोळे पाणावतील