महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी

 

मुंबई | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. तसेच आता काही प्रमाणात बंधने शिथिल करण्यात आलेली आहे.

तसेच राज्य सरकारकडून मिशन बिगीनची सुरुवात करण्यात आली होती, मात्र राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले आहे.

या निर्णयामुळे विश्वासात न घेता पुन्हा लॉकडाऊन वाढवल्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या नेत्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांनी, निर्णय घेण्याआधी मंत्र्याना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार केली आहे. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, मंत्र्यांची नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज बैठक होणार असल्याची माहिती आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.