इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा हंगाम आता प्लेऑफच्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी सुरवातीला चांगली नव्हती. पण गेल्या काही सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सने दिमाखदार खेळी करत विजय मिळवला आहे. मोसमाच्या सुरुवातीला महेंद्रसिंग धोनीने(Mahendrasingh Dhoni) चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद रवींद्र जडेजाच्या हाती सोपवले होते.(Dispute between Ravindra Jadeja and Chennai Super Kings)
पण काही दिवसांपूर्वी रवींद्र जडेजाने पुन्हा कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीला दिले. यादरम्यान रवींद्र जडेजाबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग्स संघातून वगळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्या रवींद्र जडेजा दुखापतीने त्रस्त आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली आहे. हा सामना चेन्नईने गमावला आहे. यानंतर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात रवींद्र जडेजा दुखापतीमुळे खेळू शकला नाही. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या या सामन्यात
चेन्नईने विजय मिळवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई संघ व्यवस्थापनाने रवींद्र जडेजाला सोशल मीडिया अकाउंटवर अनफॉलो केले आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाच्या फॉलोइंग लिस्टमध्ये रवींद्र जडेजाचे नाव नाही. त्यामुळे सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. रवींद्र जडेजाला संघाबाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे.
आयपीलच्या मागील हंगामात डेव्हिड वॉर्नरबाबतीत देखील असाच प्रकार घडला होता.सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला संपूर्ण हंगामात संघाबाहेर ठेवले होते. तसेच त्याचे कर्णधारपद देखील काढून घेण्यात आले होते. यंदाच्या हंगामात डेव्हिड वॉर्नरचा दिल्ली कॅपिटल्स संघात समावेश करण्यात आला आहे. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने पहिले ८ सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त २ सामने चेन्नई सुपर किंग्सने जिंकले होते.
रवींद्र जडेजाने आयपीएल २०२२ च्या हंगामात आतापर्यंत १० सामने खेळले असून १९.३३ च्या सरासरीने त्याने केवळ ११६ धावा केल्या आहेत. या मोसमात जडेजा गोलंदाजीतही फारसा प्रभाव पडू शकला नाही. त्याने गोलंदाजी करत असताना केवळ ५ विकेट्स घेतल्या आहेत. आता रवींद्र जडेजाला संघाबाहेर ठेवले जात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
PHOTO : पेढा की बर्फी? ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ फेम देवकी म्हणजे मीनाक्षी राठोड झाली आई
VIDEO : समुद्रातील शिंपल्यांपासून उर्फीने तयार केला बिकीनी टॉप; ट्रोलर्स म्हणाले, ‘देवाला तरी घाबर’
धक्कादायक! साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने सोडली फिल्म इंडस्ट्री, आता करणार शौचालय साफ