लाडकी दयाबेन दिशा वकानी पुन्हा एकदा दिसणार तारक मेहतामध्ये; पहा गरब्याचा स्पेशल व्हिडीओ

टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध मालिकांमधले एक नाव म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. आता याच मालिकेचे ऍनिमेटेड व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचे नाव तारक मेहता का छोटा चष्मा असे ठेवण्यात आले आहे.

आता या ऍनिमेटेड व्हर्जनचा टायटल ट्रॅक लाँच करण्यात आला आहे. या टायटल ट्रॅकमध्ये तारक मेहता मालिकेतील सर्व पात्र दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे दयाबेन सुद्धा दिसून आली असून ती गरबा खेळताना दिसत आहे.

या कार्टून व्हर्जनच्या ट्रॅकमध्ये जेठालाल आणि बाकीच्या पात्रांना ऍनिमेट केलेले दाखवण्यात आलेले आहे. ट्रॅकमध्ये तारक मेहताचा उल्टा चष्मा इथपासून ते तो छोटा कसा झाला तिथपर्यंतचा प्रवास दाखवला आहे.

हा शो तारक मेहता का उल्टा चष्माचे पात्र जेठालाल, दया, टप्पु आणि बाबुजी, तसेच दुसऱ्या पात्रांवर आधारीत असणार आहे. या शोचे क्रिएटर असित कुमार मोदी आहे. हा शो सोनी या वर दिसणार आहे. हा शो सोमवार ते शुक्रवार सकाळी ११:३० वाजता बघायला मिळणार आहे.

दरम्यान, तारक मेहता का उल्टा चष्माला १३ वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाले आहे. २००८ मध्ये ही मालिका सुरु झाली होती, पण आजही या मालिकेचे लोकांमधले क्रेज कमी झालेले नाही. विशेष म्हणजे ऑरिजनल शोमध्ये दयाबेन म्हणजेच दिशा वकानी दिसत नव्हती, पण आता या ऍनिमेटेड शोमध्ये ती दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐश्वर्या रायच्या पत्रिकेत होता मंगल दोष; अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी झाडासोबत केले लग्न?
आलिशान गाड्या, मुंबईत बंगला, फ्लॅट; ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेले किशोर नांदलस्कर
केंद्र सरकारची कपटनिती; महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्सप्रेस ट्रेनचा खोळंबा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.