नवं वळण! दिशा सॅलियनच्या मृत्यूचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी? ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. तसेच न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून तिला ‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली आहे. तसेच सुशांत मृत्यूप्रकरणी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.

तसेच सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर करण्यात येत असलेल्या तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. याचबरोबर सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधी सुशांतची मॅनेजर दिशा सॅलियनचाही मृत्यू झाला होता. यामुळे दिशाच्या मृत्यूशी सुशांतच्या मृत्यूचे काही कनेक्शन आहे का? याचा आता कसून तपास सुरु आहे.

सीबीआय दिशाच्या मृत्यू बाबत तपास सुरु केला आहे. यामध्ये दिशा सॅलियनच्या मृत्यूचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी असण्याची शक्यता असल्याचे सीबीआय टीमकडून समजत आहे. या तपासादरम्यान दिशाच्या शेजाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे.

या तपासात शेजाऱ्यांकडून देखील याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. दिशाच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने दिशाच्या मृत्यूबाबत महत्वाची माहिती दिली आहे. यामध्ये दिशा तिचा प्रियकर रोहन रॉय बरोबर राहत असल्याची माहिती मिळाली.

याचबरोबर दिशाचा पडलेला आवाज ऐकून बिल्डींगमधील सर्वजण खाली आले होते. दिशाची बॉडी बिल्डींगच्या बाहेर पडली होती. तसेच बिल्डींग बांधकाम नवीन असल्यामुळे फ्लॅटच्या बालकनीला ग्रील बसवलेलं नव्हतं, अशी माहिती या तपासात समोर आली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचं हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन !
चीनमध्ये एका नवीन विषाणूचे थैमान; हजारो रुग्ण सापडल्याने उडाली खळबळ
प्रचंड टिकेनंतर कांदा निर्यातबंदीवर सरकारची माघार! ‘ह्या’ निर्यातीला दिली परवानगी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.