त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? दिशाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन मृत्यूबाबतही गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. दिशाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला हे मानले जात आहे. पण सुशांतच्या मृत्यूनंतर दिशाचे कनेक्शन त्याच्या मृत्यूशी जोडले जात आहे.

याचबरोबर आता दिशा सालियन मृत्यूबाबतही अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार दिशाच्या एका मैत्रिणीने त्या दिवसाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये नवनवीन मोठ्या गोष्टींचा खुलासा झाला आहे.

ज्या दिवशी दिशाचा मृत्यू झाला त्या दिवशी दिशाच्या घरी तिचा होणारा पती रोहन, हिमांशु आणि कॉलेजमधील मित्र नील व दीप हे होते. सगळेच पार्टी करत होते आणि ड्रिंकही करत असल्याची माहिती त्या मैत्रिणीने चौकशीदरम्यान दिली आहे.

दरम्यान, व्यसन केल्यानंतर दिशा फार भावनिक झाली होती. ती पुन्हा पुन्हा बोलत होती की, कुणालाही तिची काळजी नाही. यावरून शंका निर्माण होऊ शकते. मात्र याबाबत दिशाच्या मैत्रिणीने सांगितले की, ड्रिंक घेतल्यावर ती नेहमीच अशा प्रकारे बोलत होती. मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार आता तपास सुरु आहे.

तसेच याआधी दिशाच्या मृत्यूच्या दिवशी पार्टीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा खुलासा प्रत्यक्षदर्शीने एका वृत्तवाहिनीकडे केला. याचबरोबर त्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधला एक स्टारसुद्धा उपस्थित होता, असेही त्याने सांगितले आहे. प्रत्यक्षदर्शीने केलेल्या या धक्कादायक खुलास्याने खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचं हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन !
…तर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे व सुप्रिया सुळेंना सहा महीने तुरूंगात बसावे लागणार
प्रचंड टिकेनंतर कांदा निर्यातबंदीवर सरकारची माघार! ‘ह्या’ निर्यातीला दिली परवानगी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.