जाणून घ्या दिशा पटानीच्या लव्ह स्टोरीबद्दल; टायगरच्या अगोदर टेलिव्हिजन अभिनेत्याला करत होती डेट

बॉलीवूडमधील बोल्ड आणि ब्यूटीफल अभिनेत्री दिशा पटानीला ओळखले जाते. दिशाचा जन्म उत्तराखंडमध्ये झाला होता. पण अभिनेत्री बनण्याचे स्वप्न दिशाला मुंबईत घेऊन आले. कॉलेजच्या दिवसांपासून तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी दिशाने तिचे शिक्षण अपूर्ण सोडले होते. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. म्हणून दिशाने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. पण तिच्या घरच्यांनी पहिले शिक्षण पुर्ण करायला सांगितले. म्हणून तिने इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला.

पण दिशाने तिचे इंजिनिअरिंगचे शिक्षण कधी पुर्ण केलेच नाही. कारण दिशाला अभिनय क्षेत्रात प्रवेश करायचा होता. त्यासाठी २०१३ मध्ये तिला एक संधी मिळाली होती. ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेण्यासाठी दिशाने कॉलेज मधूनच सोडले होते.

या स्पर्धेमध्ये दिशा फर्स्ट रनरअप होती. या कालावधीमध्ये दिशाने अनेक ऑडिशन दिल्या होत्या. ‘हिरोपंती’ चित्रपटासाठी देखील दिशाने ऑडीशन दिले होते. पण त्यात तिला यश मिळाले नाही. याच काळात दिशाने एका साऊथ चित्रपटासाठी ऑडीशन दिले होते.

त्यामुळे दिशाला साऊथ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. दिशा पटानीने ‘लोफर’ या तेलगू चित्रपटातून तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली आहे. या चित्रपटानंतर देखील दिशाने अनेक ठिकाणी ऑडीशन दिल्या.

तेव्हा दिशाला ‘एम.एस.धोनी’ चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. ‘एम.एस. धोनी’ हा दिशाचा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात तिचा रोल खुप छोटा होता. पण तो तेवढाच प्रभावी देखील होता. या चित्रपटामूळेच दिशा प्रसिद्ध झाली होती.

बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दिशा एका टेलिव्हिजन अभिनेत्याला डेट करत होती. मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये दोघांची भेट झाली आणि दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. अनेक वर्ष दोघांचे अफेअर सुरु होते.

या अभिनेता होता पार्थ समंथान. बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दिशा पार्थला डेट करत होती. दिशाच्या पहील्या चित्रपटानंतर दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली आणि दोघे वेगळे झाले. करिअरसाठी दोघे वेगळे झाले. काही वर्षांपूर्वी दिशा आणि पार्थचे ब्रेकअप झाले.

बॉलीवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर दिशाचे नाव बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडले गेले. अनेकदा त्यांना एकत्र पाहीले गेले. इंडस्ट्रीच्या प्रत्येक पार्टीमध्ये दोघे एकत्र असतात. पण त्यांनी कधीच त्यांचा नात्याचा स्वीकार केला नाही.

दिशाने अभिनेत्री बनण्यासाठी कॉलेजचे शिक्षण अपूर्ण ठेवले आहे. तिने कॉलेज सुरु असताना मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. ती फक्त ५०० रुपये घेऊन मुंबईला आली होती. आज तिने या क्षेत्रात तिची एक खास ओळख निर्माण केली आहे.

महत्वाच्या बातम्या –
सलमान खान, माधूरी दिक्षितसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या साहिला चड्डाची आज झाली आहे वाईट अवस्था
भिकारी बनणे संजीव कुमारला पडले महागात; दिग्दर्शकाने न ओळखताच सेटवरुन पळवून लावले
‘शोले’ चित्रपटातील गब्बरचा लुक रमेश सिप्पीने नाही तर आमजद खानने केला होता डिझाइन
अमिताभ बच्चनने दुसऱ्यांदा राजकारणात यायला दिला नकार; चिडलेल्या राजीव गांधीने राजेश खन्नाला बनवले स्टार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.