मुंबईत ५०० रूपये घेऊन आलेली दिशा पटानी आज करते बॉलिवूडवर राज्य, वाचा तिची यशोगाथा

आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडची बिंदास अभिनेत्री दिशा पटानीबद्दल काही माहिती देणार आहोत. तीने बॉलिवूडमध्ये आपले नाव कसे कमावले याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा जन्म १३ जून १९९२ रोजी बरेली येथे झाला होता.

दिशा बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबत तिच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. दिशा सोशल मीडियावर आपल्या बोल्ड फोटोंनी नेहमी धुमाकूळ घालत असतात. अलीकडेच प्रदर्शित झालेला दिशाचा आणि सलमान खानचा राधे हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की दिशा मुंबईत फक्त ५०० रूपये आली होती.

परंतु खुप कमी वेळात तिने प्रचंड यश मिळवले आहे आणि तिने स्वत: ला 5 कोटी रुपयांचे घर गिफ्ट केले आहे. दिशाने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात २०१५ सालच्या तेलगू चित्रपट ‘लोफर’ पासून केली होती. पुढच्या वर्षी २०१६ मध्ये दिशाने ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

या चित्रपटात दिशाची भूमिका खूपच लहान होती. पण तरीही दिशाचा अभिनय प्रेक्षकांना आवडला. दिशा तिच्या ‘कुंग फू पांडा’ चित्रपटासाठी चर्चेत होती. दिशाला लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करायचे होते. चित्रपटांमध्ये दिसण्यासाठी तिने आपले शिक्षणही मधूनच सोडले.

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटले असेल की दिशा फक्त ५०० रूपये घेऊन मुंबईत आली होती . दिशाने तिच्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. ती म्हणाली, “मी एकटीच राहत असे आणि काम करायचे पण माझ्या कुटूंबाकडून मी कधीच मदत मागितली नाही.”

तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला दिशाने टीव्ही अभिनेता पार्थ समथनला डेट केले. हे दोघे जवळपास १ वर्षापासून एकमेकांशी रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी पार्थ हा टीव्हीचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार होता. नंतर दिशाचा पार्थकडून ब्रेकअप झाला. पार्थबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर दिशाने टायगर श्रॉफला डेट करायला सुरुवात केली.

बॉलिवूडमध्ये यशस्वी झाल्यानंतर दिशाने मुंबईच्या वांद्रे येथे स्वताचे घर विकत घेतले आहे. दिशाने २०१७ मध्ये तिच्या वाढदिवशी स्वत: ला हे घर गिफ्ट केले होते. पाच कोटी रुपये किंमतीच्या या घराचे नाव आहे ‘लिटल हट’ आहे. आज तिचे अनेक चाहते आहेत. आपल्या फिटनेसमुळे ती नेहमी चर्चेत असते.

तिने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. टायगर श्रॉफसोबत तिने अनेक चित्रपट केले आहेत. सलमानसोबतही तिने बरेच चित्रपट केले आहेत. सध्या ती बॉलिवूडमधील बिंदास अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.