दिशाने मृत्यूआधी कुणाला फोन केला होता..अखेर पोलिसांनी केला उलगडा

मुंबई| सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान या प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे होत आहेत. दिशा ही सुशांतची मॅनेजर होती. सुशांतच्या मृत्यूआधी काही दिवस तिने आत्महत्या केली होती. यामुळेच तिच्या आणि सुशांतच्या मृत्यूची तपासणी ही जोरात सुरु आहे.

पोलीस तपासात दिशाबद्दल नवीन गोष्टींचे खुलासे उघड होत आहेत. तिच्या शेवटच्या फोनबद्दल नवीन माहिती हाती आली आहे. तिने शेवटचा फोन १०० नंबरला केला अशी अफवा होती. मात्र पोलिसांनी त्याचा पाठपुरावा केला. आणि समोर वेगळीच माहिती आली.

दिशाने शेवटचा फोन १०० नंबरवरती म्हणजेच पोलीस नियंत्रण कक्षामध्ये केला नसल्याचे या चौकशीमध्ये समोर आले. दिशाने शेवटचा फोन हा तिच्या लंडनच्या मैत्रिणीला केला असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, दिशाचे वडील सतीश सालियान यांनी दिलेल्या माहितीनुसार,१ महिना आधी त्यांनी स्वतःच दिशाच्या फोनवरून पोलिसांना फोन केला होता.

दिशाला मालाड येथे जाण्यासाठी ई-पासची गरज होती. या पासबाबत विचारण्यासाठी त्यांनी फोन केला होता. दिशा व तिचा नवरा रोहन यांना मालाड येथील त्यांचे घर स्वच्छ करण्यासाठी गाडीने जायचे होते. त्यासाठी त्यांनी पोलिसांना फोन करून पासबद्दल विचारले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.