माणुसकीला काळिमा! एक मुलगा नेता आणि एक अधिकारी असूनही आईला सोडले रस्त्यावर

मुंबई | सोशल मीडियावरून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. मुले अधिकारी, नेते असूनही त्यांची आई रस्त्यावर राहत आहे.

सोशल मीडियावर एक फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. ही पोस्ट एका आयएएस अधिकाऱ्याने शेअर केली आहे, यात एक महिला रस्त्यावर झोपलेली आहे. त्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, त्या महिलेचा एक मुलगा अधिकारी, दुसरा मुलगा नेता आहे.

हा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे मात्र त्या महिलेचे नाव अद्यापही माहित झालेले नाही. सध्या आई वडिलांनी संभाळलेली मुले आई वडिलांनाच वृद्धाश्रमात सोडून येत असल्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे.

अनेकदा मुलांना नोकरी मिळाली की ते आपल्या आईवडिलांना घराबाहेर काढून देताना दिसत आहे. तर काही ठिकाणी स्वतः आईवडीलच घरातल्या त्रासाला कंटाळून घर सोडून जाताना दिसत आहे.

दरम्यान, कोरोना काळात अनेक लोकांनी माणुसकीचेही दर्शन घडवून दिले आहे. संकट काळात अनेक रक्ताची सोडून गेली असता माणुसकीच्या नात्यांची अनेक उदाहरणे लोकांसमोर आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.