भुख लागली असेल बिनधास्त खा, पैसे देऊ नका; सोशल मीडियावर तमिळनाडुच्या फळविक्रेत्याची चर्चा

तमिळनाडु | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोनाची लाट आल्यापासून हातावर पोट असलेल्यांचे हाल होत आहेत. गरजूंना दोन वेळचं जेवण मिळणं मुश्किल होत आहे. कोरोनामध्ये खेळाडू, नेते, कलाकार  गोरगरीबांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

कोरोना महामारीमध्ये सर्वसामान्य  व्यक्तीही रस्त्यावरील गोरगरीबांची मदत करत आहेत. तमिळनाडूमधील एक फळ दुकानदारही गोरगरीबांना मोफत फळे वाटत त्यांची भुख भागवत आहे. पण या फळविक्रेत्याने मदत करण्यासाठी एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे.

तमिळनाडूमधील थुटूकुडी जिल्ह्यातील कोविलपट्टी गावातील मुत्थुपांडी नावाचा व्यक्ती फळविक्री करून आपल्या संसाराचा गाडा चालवतो. कोरोनामुळे त्याच्या व्यवसायालाही मोठा फटका बसला. मात्र तरीही त्याने गोरगरीबांना होईल तशी मदत करायची ठरवली.

मुत्थुपांडी गेल्या २ वर्षांपासून फळे विकण्याचं काम करतो. दुकान बंद करायच्या आधी केळीची फणी दुकानाच्या बाहेर ठेवतो आणि दुकान बंद करून घरी निघून जातो. गेल्या २ वर्षांपासून ते दुकान बंद करायच्या आधी अनेक केळीची फणी दुकानाबाहेर ठेवतो.

दुकानाबाहेर मुत्थुपांडीने एक  बोर्ड लावला आहे. त्यावर त्याने लिहिले की, तुम्हाला भुख लागली असेल तर केळी खावा. याचे कुणी पैसेही देऊ नये. कृपया फळाचा नाश करू नका. रस्त्यावरील गोरगरीब, लहान मुलं भुख लागल्यानंतर याठिकाणी येऊन केळी खातात.

मुत्थुपांडी म्हणतो की, कोरोना महामारीमुळे गोरगरीबांचे जेवनासाठी हाल होत आहेत. त्यामुळे आपणही काय तरी करून त्यांची मदत करावी असा विचार आला आणि मदत करण्यास सुरूवात केली.  आजवर अनेकजण इथे येऊन फळे खात आहेत.

फळे खावून त्यांची भुख भागत आहे. यामुळे मला आनंद होत आहे. असं मुत्थुपांडी म्हणाला. फळे खाऊन लोक मुत्थुपांडीचे आभारही  मानत आहेत. सोशल मिडियावर सध्या मुत्थुपांडीचे कौतूक होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
त्रिदेव, विश्वात्मा चित्रपटांमध्ये आपल्या बोल्ड सीन्सने लोकांना घायाळ करणारी अभिनेत्री आज करते ‘हे’ काम
आईच्या पार्थिवास अग्नी देण्यास इंजिनिअर मुलाने दिला नकार; शेवटी जे झाले ते ऐकून धक्का बसेल
ऑक्सिजन सिलेंडर न मिळाल्याने शेतात झाडाखाली जाऊन बसला; अन् ३ दिवसातच कोरोनाला हारवून आला

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.