डॅशिंग IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीची चर्चा; ‘इथे’ बदली होण्याची शक्यता  

नाशिक । डॅशिंग IPS म्हणून ओळख असलेले पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीची चर्चा सध्या नाशिकमध्ये सुरु आहे. IPS विश्वास नांगरे पाटील यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या बदलीची चर्चा आहे.

त्यांची फेब्रुवारी २०१९ मध्ये नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. नाशिकचे तत्कालिन पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या जागी नांगरे पाटील यांची नियुक्ती झाली होती.

त्याआधी नांगरे पाटील हे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नाशिकमध्ये कायदा-सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राखला होता.

नाशिकमध्ये कोरोनाच्या काळातही कायदा सुव्यवस्था राखण्यात नांगरे पाटील यशस्वी ठरले. त्यामुळे त्यांच्या बदलीला स्थगिती मिळते की त्यांना पदोन्नती मिळून मुंबईत त्यांची सहआयुक्तपदी बदली होणार याबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत.

विश्वास नांगरे पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. शिराळा तालुक्यातील कोकरुड हे त्यांचे मूळ गाव. विश्वास नांगरे पाटील यांचा आयपीएस बनण्यापर्यंतचा प्रवास खडतर होता.

त्यांची जिथे जिथे बदली झाली त्याठिकाणी त्यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे आता त्यांची बदली कोठे होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.