गुड न्युज! पेट्रोल डिझेल टाकल्यावर मिळणार तब्बल १५० रुपयांची सूट; ‘असा’ मिळवा फायदा

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव सतत वाढत आहेत. मध्यंतरी पाच राज्यांच्या निवडणुका असल्यामुळे हे भाव स्थिर होते. मात्र पुन्हा एकदा आता पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढू लागले आहेत. यामुळे सामान्य लोकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. केंद्र सरकारवर यामुळे टीका देखील केली जात आहे.

आता मात्र पेट्रोल आणि डिझेलवर दीडशे रुपये कॅश बॅक मिळणार आहे. यामुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करण्याची मागणी केली जात आहे. मात्र सरकारकडून तसे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही.

आता मात्र फोन पे तुम्हाला ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यामुळे तुमचे तब्बल दीडशे रुपये वाचणार आहेत. इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत गॅस यांच्याकडून आपल्या ग्राहकांसाठी ही खास ऑफर देण्यात आली आहे.

या कॅशबॅक नुसार तुम्हाला महिन्यात दीडशे रुपये कॅश बॅक मिळणार आहे ३० जून २०२1 पर्यंत ही ऑफर चालू असणार आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत असताना ही एक दिलासादायक बातमी आहे. यामुळे तुमचे पैसे वाचणार आहेत.

पेट्रोलने सध्या शंभर रुपये पार केले असून यावरचा टॅक्स कमी करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सतत केली जात आहे. मात्र यावर अजूनही कोणताही निर्णय झाला नाही. यामुळे केंद्र सरकारवर टीका होत आहे.

मात्र राज्य सरकारचा टॅक्स जास्त असल्याचे विरोधक सांगतात. या गोंधळात मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे. रोज थोड्याफार प्रमाणावर हे दर वाढत आहेत. यामुळे सध्या इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. यामुळे आता १५० रुपये सूट मिळणार असल्याने काहीसा दिलासा मिळणार आहे.

ताज्या बातम्या

सोनू सूदच्या मदतीवर कलेक्टरने व्यक्त केला संशय; सोनूने थेट पुरावेच फेकले तोंडावर

धक्कादायक! आयसीयु बेड मिळवून देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्याने मागितले १ लाख ८० हजार

कुली चित्रपटातील हा चिमुकला आठवतो का? आता हा बिझनेस करून कमावतोय करोडो रूपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.