‘शाळा सुरू करण्यावरून मंत्रीमंडळात मतभेद; राज्यमंत्री बच्चू कडूंचा शाळा सुरू करण्यास विरोध’

 

मुंबई | सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरू होते, आता ते थोड्याफार प्रमाणात शिथिल करण्यात येत आहे.

मात्र अद्यापही कोरोना संकटाचा धोका पूर्णतः न टळल्याने राज्य सरकार विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत विचार करत असल्याचे दिसून येत आहे.

आता याबाबत बोलताना, शाळा सुरू करणे आणि ऑनलाईन शिक्षण याबाबत ताळमेळ आणि स्पष्टता नाही, असे म्हणत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवणे, ही पद्धत अत्यंत चुकीची असून ही बंद केली पाहिजे, असेही यावेळी बच्चू कडू म्हणाले आहेत.

आज ३५ ते ४० टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहे, तसेच मुंबई पुण्याचे विद्यार्थी म्हणजे संपूर्ण राज्य नाही.

ग्रामीण भागांमधील विद्यार्थी यापासून वंचित राहत आहे. सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, गरीब आणि ग्रामीण भागांमधील विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये, असेही बच्चू कडू म्हणाले आहेत.

त्यामुळे जो पर्यंत ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था प्रत्येकासाठी करता येत नाही, तो पर्यंत ते बंद ठेवावे, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, धोरणात्मक निर्णय घेताना बऱ्याचदा राज्यमंत्र्यांस विचारात घेतले जात नाही. निर्णय परस्पर घेतले जातात.

तसेच मला विचारले असते तर ग्रामीण विद्यार्थ्यांची परिस्थिती काय आहे, हे सांगून निर्णय घ्यायला लावला असता, असेही बच्चू कडू म्हणाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.