रुग्णवाहिका अचानक हालताना दिसली; लोकांनी पाहिलं असता रुग्णवाहिकेत सुरू होता घाणेरडा प्रकार

वाराणसी | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात रुग्णवाहिका, लस, ऑक्सिजन, बेड यांचा तुटवडा जाणवत आहे.

देशात काही राज्यांमध्ये कोरोनाची लाट कमी होताना दिसून येत आहे. मात्र आजूनही काही राज्यांमध्ये कोरोनाची भयंकर परिस्थिती आहे. कोरोना रुग्णांना रुग्णालयात नेण्या आणण्यासाठी रुग्णवाहिका लवकर मिळत नाहीत.

रुग्णांना मृत्यूनंतर स्मशानभूमीत नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाने रौद्र रुप धारण केले आहे. अशातच राज्यामध्ये एका रुग्णवाहिकेत घाणेरडा प्रकार घडला आहे.

वाराणसीमधील सुजाबादी चौकी परिसरात एक रुग्णवाहिका उभी होती. परिसरातील लोकांना काही वेळाने ही रुग्णवाहिका हलताना दिसली. आजूबाजूच्या लोकांना वाटलं की रुग्णवाहिकेत रुग्ण तडफडत आहे.

यामुळे लोकांनी रुग्णवाहिकेत डोकावून पाहिले असता. त्यांना आतील दृश्य पाहून धक्काच बसला. रुग्णवाहिकेत तीन तरूण आणि एक तरूणी होती.  आतमध्ये तरूणांचे आणि तरूणीमध्ये घाणेरडा प्रकार सुरू होता. लोकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी या तरूणांना आणि तरूणीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करत रुग्णवाहिक जप्त केली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  एकीकडे रुग्णवाहिके अभावी रुग्णांचा जीव जात आहे. तर दुसरीकडे रुग्णवाहिकेतच घाणेरडा प्रकार सुरू असल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
आदर पुनावालानंतर वडील सायरसही गेले लंडनला, पण वेगळेच कारण आले समोर; जाणून घ्या खरं काय..
तौत्के वादळाचा तडाख्यात अवघ्या 10 सेकंदात पत्ताच्या बंगल्यासारखे कोसळले घर; पाहा व्हिडीओ
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडच ‘लॉकडाऊन लग्न’, म्हणतेय ही तर नवीन सुरवात..
उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची परिस्थिती बिकट; ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णाने गाठली मुंबई

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.