विद्यार्थ्याचं घाणेरडं कृत्य! ऑनलाईन क्लासदरम्यान महिला शिक्षिकेला दाखवला प्रायव्हेट पार्ट

मुंबई। ऑनलाईन क्लासदरम्यान नववीमध्ये शिकणाऱ्या एका 15 वर्षीय विद्यार्थ्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन क्लास सुरु असताना या विद्यार्थ्यानं आपला प्रायव्हेट पार्ट महिला शिक्षिकेला दाखवल्याचे समोर आले आहे.

या घाणेरड्या कृत्यानंतर विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गेले वर्षभर देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने शाळा तसेच महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत.

अशातच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी गेले वर्षभर सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र विद्यार्थी क्लास दरम्यान घाणेरडे कृत्य करताना दिसत आहेत.

अशातच अजून एक हि घटना घडली आहे. 15 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान ऑनलाईन क्लासमध्ये प्रायव्हेट पार्ट दाखवण्याची ही घटना अनेकदा घडली. यानंतर महिला शिक्षिकेनं क्लास बंद करण्यापर्यंतचा विचार केला होता.

मात्र, नंतर पीडित शिक्षिकेनं मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात आरोपी विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकाऱ्यानं माहिती दिली, की पोलिसांनी आरोपीला राजस्थानमधून अटक केली आहे.

या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी मागील महिन्यातही मुंबई पोलिसांची टीम राजस्थानमध्ये गेली होती. जैसलमेरमधून आरोपी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.

अटक केल्यानंतर आता विध्यार्थाचं एक लॅपटॉप जप्त केला आहे. आरोपीनं आपल्या लॅपटॉपमध्ये गार्ड लावून ठेवलं होतं, जेणेकरून त्याचा आयपी अॅड्रेस ट्रॅक करता येऊ नये.

या विद्यार्थ्यानं अत्यंत हुशारीनं हे कृत्य करत स्वतःचा चेहरादेखील लपवला होता. मात्र, एकदा या महिला शिक्षिकेनं आरोपीच्या बँकग्राऊंडचा स्क्रिनशॉट घेऊन ठेवला होता.

याचमुळे तपासात पोलिसांना मदत झाली. व आता अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि यानंतर त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या
आंदोलनात येणाऱ्या मंत्र्यांबाबत ‘ही’ भूमिका घ्या; संभाजीराजेंचे मराठा आंदोलकांना स्पष्ट आदेश
…म्हणून अमिताभ बच्चनने बॉलीवूड सोडून गावाकडे जाण्याचा घेतला होता निर्णय
चीनचा होणार विनाश? ‘या’ कारणामुळे लाखो लोकांवर मृत्यूची टांगती तलवार
हलगर्जीपणाचा कळस! 899 लोकांना ‘एक्सपायर’ झालेल्या लसीचे डोस टोचले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.