हॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला ऐश्वर्यासोबत एक रात्र घालवायची होती पण…

बॉलीवूड असो किंवा हॉलीवूड अभिनेत्रींना सगळीकडेच वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेक अभिनेत्रींना दिग्दर्शक निर्माते यांच्या विरोधात यौन शोषणसारख्या गंभीर तक्रारी केल्या आहेत. असेच एक प्रसिद्ध हॉलीवूड निर्माते म्हणजे हॉर्व वेस्टन.

हॉर्व वेस्टनवर आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी यौन शोषणचा आरोप लावला आहे. त्यात अनेक मोठ्या मोठ्या हॉलीवूड अभिनेत्रींच्या नावाचा समावेश होता. आत्ता हॉर्वे वेस्टनबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा खुलासा त्यांच्या एका जवळच्या व्यक्तिने केला आहे.

हॉर्वे वेस्टनची एका बॉलीवूड अभिनेत्रीवर देखील वाईट नजर होती. हे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. पण ही गोष्ट खरी आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्या राय आहे. ऐश्वर्या रायवर हॉर्वे वेस्टनची वाईट नजर होती.

ऐश्वर्या रायने बॉलीवूडमध्ये यश मिळाल्यानंतर हॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. तिने हॉलीवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यामूळे ती हॉलीवूडचा प्रसिद्ध चेहरा बनली होती. ऐश्वर्याचे मॅनेजर शिमॉन शेफील्ड यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे.

शिमॉन यांनी सांगितले की, ‘मला सांगताना हसायला येतय की हॉर्वे यांनी ऐश्वर्याला मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना यश मिळाले नाही. अनेकदा त्यांनी ऐश्वर्याला हॉटेलवर एकटीला बोलावले. पण त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाही’.

‘ऐश्वर्याला मिळवण्यासाठी त्यांनी मला लाच दिली होती. पण मी ती घेतली नाही माझे काम प्रामाणिकपणे केले. त्यांनी मला ऐश्वर्याला हॉटेलमध्ये घेऊन येण्यासाठी लाखो रुपयांची ऑफर दिली होती. पण मी ती स्वीकारला नाही. मग त्यांनी मला धमकी दिली तरीही मी घाबरले नाही. ऐश्वर्याला मी कधीच त्यांच्याकडे पाठवले नाही’. असे शिमॉनने सांगितले.

या खुलासा अनेकांसाठी धक्कादायक होता. पण ऐश्वर्याने मात्र यावर कधीही कोणतेही मत व्यक्त केले नाही. तिने बॉलीवूडसोबतच हॉलीवूडमध्ये देखील काम केले आहे. म्हणून ती तिकडे देखील खुप प्रसिद्ध आहे. असे एक नाही तर अनेक किस्से आहेत.

महत्वाच्या बातम्या –

अक्षय कुमारचा विरोध असतानाही त्याच्या बहिणीने ५६ वर्षीय घटस्फोटीत व्यक्तीसोबत केलं लग्न, कारण..
शुटींग संपताच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील कलाकार करतात ‘अशी’ धमाल; पहा व्हिडीओ
…म्हणून विनोद खन्नाने मुकेश भट्टच्या दणादण कानाखाली वाजवल्या होत्या
राजेंद्र कुमारला बघण्यासाठी पागल झाले होते लोकं; पोलिसांनी लाठीचार्ज करुन सांभाळली होती परिस्थिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.