किंचाळणाऱ्या बोक्याला पिंजऱ्यात टाकले, म्हणत बड्या बाॅलीवूड दिग्दर्शकाने केले ठाकरेंचे कौतूक

मुंबई । अर्णब गोस्वामी अटक प्रकरणावरून राज्यात आता राजकीय वातावरण तापले आहे. काहींनी या प्रकरणी ठाकरे सरकारवर टीका केली तर काहींनी या कारवाईचे समर्थन केले आहे.

यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे हिम्मत दाखविली आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक केली. कारवाई पाहून मला समाधान वाटले असे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांनी म्हटले आहे.

अर्णब गोस्वामीवरील कारवाई पाहून मला समाधान वाटले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांसारखी हिंमत दाखविली आहे. एका किंचाळणाऱ्या बोक्‍याला थेट पिंजऱ्यात टाकल आहे. वर्मा यांच्या ट्विटला नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांनी या कारवाईचे समर्थन केले आहे.

राम गोपाळ वर्मा हे समाजात घडणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया देत असतात. याबाबत ते ट्‌विटही करत असतात. अर्णब गोस्वामी यांच्यावर रायगड पोलिसांनी केलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले आहे. वर्मा हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते आहेत. बाळासाहेबांच्या बद्दल ते नेहेमी आपला आदर व्यक्त करतात.

बाळासाहेब जसे धाडस दाखवायचे तसेच धाडस उद्धव ठाकरे यांच्याकडेही असल्याचे वर्मा यांनी म्हटले आहे. यामुळे आता या कारवाईचे समर्थन देखील केले जात आहे. कोर्टाने अर्णब याला कोठडी सुनावली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.