Share

Director Sanjay Gupta On Bollywood Celebrity Demand: ‘व्हॅनिटी व्हॅनमध्ये बॉलिवूड स्टार्स नग्नावस्थेत…’; दिग्दर्शक संजय गुप्ता यांचा धडाकेबाज खुलासा

Director Sanjay Gupta On Bollywood Celebrity Demand:  बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीबद्दल अनेकदा ग्लॅमरच्या मागचं खरं वास्तव बाहेर येतं. दिग्दर्शक संजय गुप्ता (Sanjay Gupta) यांनी नुकत्याच एका पॉडकास्टवर या दुनियेचं असंच काळं सत्य उघडपणे सांगितलं आहे. काही स्टार्स आज सेटवर तब्बल सहा ते सात व्हॅनिटी व्हॅनची मागणी करतात. इतकंच नाही, तर स्टार कपल्स असतील तर ती संख्या थेट अकरावर पोहोचते.

गुप्तांच्या म्हणण्यानुसार, पहिली व्हॅन स्टारची वैयक्तिक जागा असते, जिथे तो मनाप्रमाणे वागत असतो, अगदी नग्नावस्थेतही बसतो. दुसऱ्या व्हॅनमध्ये मेकअप आणि केसांच्या तयारीचं काम चालतं. तिसरी व्हॅन मिटिंगसाठी राखून ठेवलेली असते, चौथी जिमसाठी, तर पाचव्या व्हॅनमध्ये बाकीचं साहित्य. आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सहावी व्हॅन असते.

गुप्ता पुढे म्हणाले की, सेटवर एक शेफ असतो आणि तो दिवसभर स्टारचं वजन ग्रॅमच्या हिशोबाने तपासतो. “पती-पत्नी असूनही काही स्टार कपल्सना वेगळ्या व्हॅन आणि अगदी वेगळ्या किचन व्हॅन हव्या असतात. ते घरी एकत्र खातात, पण सेटवर मात्र अकरा व्हॅन हव्या असतात,” असं सांगून त्यांनी बॉलिवूडची वस्तुस्थिती उघड केली.

मात्र, त्यांनी काही कलाकारांचं विशेष कौतुक केलं. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे असे एकमेव दिग्गज आहेत जे त्यांच्या कर्मचाऱ्यांचा खर्च स्वतः करतात. निर्मात्यांकडून त्याचे पैसे ते कधीही घेत नाहीत. त्याचबरोबर अजय देवगण (Ajay Devgn) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांचंही नाव त्यांनी घेतलं, कारण हे कलाकार कमी स्टाफसोबत काम करतात आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा खर्च स्वतःच उचलतात.

संजय गुप्ता यांनी सांगितलं की, त्यांनी ४० वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम केलं असून, किशोरवयात सहाय्यक म्हणून सुरुवात केली आणि १९९४ मध्ये आतिश: फील द फायर या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. एवढ्या वर्षांत त्यांनी इंडस्ट्रीचा चेहरामोहरा कसा बदलला हे जवळून पाहिलं आहे.

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now