Share

‘झुंड’ विरुद्ध ‘काश्मीर फाइल्स’ वादावर नागराज मंजुळे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मी फक्त झुंडच बघणार…’

Nagraj-Manjule.j

सध्या ‘झुंड'(Zhund), ‘काश्मीर फाइल्स'(Kashmir Files) आणि ‘पावनखिंड'(Pavankhind) या चित्रपटावरून वाद सुरु आहे. या वादावर ‘झुंड’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोंबड्यांच्या झुंजी लावून दिल्यासारखा हा वाद आहे. या वादाला काही अर्थ नाही’, अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिली आहे.(director nagraj manjule statement on zhund vs the kashmir files contrversy)

यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले की, “मी फक्त झुंडच बघणार असं म्हणणाऱ्या प्रेक्षकांचं देखील मला पटत नाही. तुम्ही सगळे सिनेमे पहा. अगदी ‘पावनखिंड’ आणि ‘काश्मीर फाइल्स’ हे चित्रपटही पहा”, असे नागराज मंजुळे म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी ‘झुंड’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यात येणार आहे, अशी चर्चा रंगली होती.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या मुद्द्यावर देखील मत व्यक्त केलं आहे. ‘झुंड’ चित्रपट करमुक्त करण्याच्या संदर्भातील कोणतीही माहिती आपल्याला मिळाली नसल्याचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितले आहे. सध्या सोशल मीडियावर ‘झुंड’, ‘काश्मीर फाइल्स’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटावरून वाद सुरु आहे.

याबाबत बोलताना दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले की, “सिनेमा आहे, तो पहा, विचार करा. तुमच्या जीवनात त्याचा परिणाम झाला तर चांगलचं आहे. दिग्दर्शक घरी राहणार पण तुम्ही सिनेमाबाहेर अशी हाणामारी करणं योग्य नाही “, असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं आहे. काही लोक सोशल मीडियावर नागराज मंजुळेंसाठी ‘झुंड’ चित्रपट पहा, अशी विनंती करत आहेत.

यावर देखील दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मत व्यक्त केलं आहे. “माझ्या प्रेमापोटी देखील झुंड पहा असं म्हणणाऱ्या लोकांचं देखील मला पटत नाही. माझी विनंती आहे असं काही करू नका. रागाने किंवा प्रेमापोटी झुंड चित्रपट पहा असं अजिबात म्हणू नका”, असे नागराज मंजुळे यांनी सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी ‘झुंड’ चित्रपटावरून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यावर टीका करण्यात आली होती.

एका गटाने टीका करत म्हटले होते की, इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला? असा प्रश्न झुंड चित्रपटावरून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना करण्यात आला होता. या टीकेला उत्तर देताना नागराज मंजुळे म्हणाले की, “मी कोणत्याही जातीला मानत नाही, त्यामुळे तुम्हीही मला कोणत्या जातीच्या बेडीत अडकवू नका.”

महत्वाच्या बातम्या :-
‘तुम्हाला १६ कोटींचा खेळाडू झेपणार नाही’, बढाई मारणाऱ्या PCL ला माजी क्रिकेटपटूने दाखवली जागा
सलमान खान मेगास्टार चिरंजीवींच्या ‘या’ चित्रपटात फ्रीमध्ये करणार काम; साऊथमध्ये करणार दमदार एन्ट्री
‘मी पूर्णपणे कर्जबाजारी झालो, माझ्यावर ३-४ खटले दाखल आहेत’; ‘लॉकअप’मध्ये अभिनेत्याने व्यक्त केलं दु:ख

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now