अभिनेत्रीने लग्नाला नकार दिला म्हणून दिग्दर्शक द्यायचा त्रास; सर्वांसमोर करायचा अपमान

८० च्या दशकात बॉलीवूडमध्ये मिनाक्षी शेषाद्रीचे राज्य होते. त्यांनी त्यांच्या सुंदरतेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. त्यांचा चाहता वर्ग खुप मोठा होता आणि आजही त्यांचे चाहते कमी झाले नाहीत. त्या काळी मिनाक्षीचे स्टारडम खुप मोठ्या प्रमाणावर होते. एका पाठोपाठ एक त्यांचे चित्रपट रिलीज व्हायचे आणि बॉक्स ऑफिसवर देखील सुपरहिट ठरायचे.

मिनाक्षी शेषाद्रीने त्यांच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. प्रत्येक अभिनेत्यासोबत त्यांची जोडी खुप पसंत केली जायची. अमिताभ बच्चन, मिथून चक्रवर्ती, सनी देओल, ऋषी कपूर, विनोद खन्ना अशा मोठ्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले आहे.

त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये खुप जास्त प्रसिद्धी मिळवली. सुभाष घईच्या ‘हिरो’ चित्रपटाने त्यांना सुपरस्टार बनवले होते. हिरो चित्रपट अपेक्षेपेक्षा जास्त हिट झाला. त्यानंतर त्यांनी होशीयार, बेवफाई, महागुरु, देहलीझ, दिलवाला, परिवार, गंगा जमूना सरस्वती,शंहशाह, जोशीला, घर हो तो ऐसा, घायल, घातक अशा चित्रपटांमध्ये काम केले.

पण गेल्या २४ वर्षांपासून त्या चित्रपटांपासून लांब आहेत. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना त्यांनी अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. आज तुम्हाला मीनाक्षी शेषाद्रीने अभिनय क्षेत्र का सोडले? याचे रहस्य सांगणार आहोत.

१९९२ मध्ये मीनाषी शेषाद्री ‘दामिनी’ चित्रपटामध्ये काम करत होत्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत रुषी कपूर आणि सनी देओल देखील मुख्य भुमिकेत होते. चित्रपटाच्या शुटींग वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक राजकूमार संतोषी मीनाषीच्या प्रेमात पडले होते.

मिडीया रिपोर्टनूसार मीनाषीला याबद्दल काहही कल्पना नव्हती. त्या फक्त आपले काम करत होत्या. पण राजकूमार मीनाषीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करायचे.

एक दिवस राजकूमार संतोषीने चित्रपटाच्या सेटवर मीनाषीला प्रपोज केले. त्यांनी वाटले होते की, मीनाषी त्यांना होकारच देणार. त्या लग्नाला नकार देऊच शकत नाहीत. पण मीनाषीने कोणत्याही गोष्टीचा विचार न करता दिग्दर्शक राजकूमार संतोषीला नकार दिला.

मीनाषीचा नकार दिग्दर्शकाला आवडला नाही. त्यामूळे त्यांनी मीनाषीला चित्रपटाच्या सेटवर त्रास द्यायला सरुवात केली. दिग्दर्शक अनेकदा मीनाषीला सेटवर थांबवून ठेवायचे. एकच सीन परत परत शुट करायला सांगायचे. त्यामूळे मीनाषी खुप वैतागल्या.

एक दिवस तर दिग्दर्शकाने सेटवरील सर्व लोकांच्या समोर मीनाषीचा अपमान केला. त्यांच्या अभिनयाला नावे ठेवली. ही गोष्ट मीनाषीला सहन झाली नाही. त्या दिवशी मीनाषी खुप रडल्या. पण त्यांनी आपले काम पुर्ण केले. त्यांनी दामिनी चित्रपट पुर्ण केला.

पण चित्रपटाच्या शुटींग वेळी मीनाषी खुप दुखी झाल्या होत्या. हे सगळं काही सहन झाले म्हणून त्यांनी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी साईन केलेले चित्रपट पुर्ण केले आणि फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. त्या परत कधी अभिनय क्षेत्रात आल्या नाही.

महत्वाच्या बातम्या –
…म्हणून मनीषा कोईरालाने सुपरहिट चित्रपट ‘जुबेदा’ला दिला होता नकार
माधुरी दीक्षितने शेअर केला विना मेकअपचा फोटो, फोटो पाहून चाहत्यांना विश्वासच बसेना, म्हणाले..
‘हम आपके है कौन’मध्ये माधूरी व रिमा लागूमध्ये असणारी ही मजेशीर गोष्ट माहितीय का? वाचून तुम्हीही हसाल
परवीन बॉबीला भेटण्यासाठी आलेला विदेशी चाहता कसा बनला बॉलीवूडचा खलनायक? वाचा बॉब क्रिस्टोची कहानी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.