अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्नाच्या प्रेमात पडला होता ‘हा’ दिग्दर्शक; काहीही करायला होता तयार

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक असे स्टार किड आहेत. जे लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहेत. अशीच एक जोडी म्हणजे निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना. वेळोवेळी दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहेत.

ट्विंकल आणि करण लहानपणापासूनचे मित्र आहेत. दोघे एकाच शाळेमध्ये शिकत होते. त्यामूळे त्यांची मित्र चांगलीच घट्ट आहे. ट्विंकलने सांगितलेली प्रत्येक गोष्ट करण जोहर ऐकायचा. एकदा तर ट्विंकलमूळे करणं जोहरचा जीव धोक्यात आला होता. जाणून घेऊया पुर्ण किस्सा.

ट्विंकलने एका पुस्तकात तिच्या आणि करणच्या नात्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ट्विंकलने सांगितले की, करण जोहरला मी खुप आवडायचे. मी करणचा क्रश होते. त्यामूळे करण नेहमी माझ्टा मागे मागे फिरायचा. जी गोष्ट मला खुप मजेदार वाटायची’.

एवढेच नाही तर ट्विंकल लहान होती. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर मिशी होती. ज्यामूळे ती अनेकांना मुलगा वाटायची. पण करण मात्र तिच्यावर फिदा होता. करणला त्या मिशीसोबत ट्विंकल खुप हॉट वाटायची. तो तिच्या प्रेमात पागल झाला होता. तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तो ऐकत होता.

करण तिचं सगळं काही ऐकतो ही गोष्ट ट्विंकलला माहीती होती. म्हणून ती अनेकदा त्याचा फायदा घ्यायची. करण जोहर हॉस्टेलमध्ये शिकायला होता. त्यावेळी त्याला ट्विंकलला भेटायची इच्छा झाली. म्हणून त्याने ट्विंकलला विचारले मी कसा हॉस्टेलमधून बाहेर पडू शकतो.

त्यांचे हॉस्टेल डोंगराळ भागात होते. त्यावेळी ट्विंकलने करणला सांगितले की, तु डोंगरावरुन खाली उतर तो एकच मार्ग आहे हॉस्टेलमधून बाहेर पडायचा. करणने ट्विंकलचे ऐकले आणि डोंगरावरुन खाली उतरु लागला. त्यावेळी तो खुप जखमी झाला होता. त्याला चालता येत नव्हते. थोडी चुक झाली असती तर त्याचा जीव देखील जाऊ शकला असता.

डोंगरावरुन खाली उतरल्यानंतर हॉस्टेलच्या लोकांनी करणला पकडले आणि तोच डोंगर चढून हॉस्टेलमध्ये परत पाठवले. त्यावेळी करणला समजले की, त्याने खुप मोठी चुक केली आहे. या घटनेबद्दल बोलताना करणने सांगितले की, ही त्याच्या आयूष्यातील सर्वात अपमानजनक घटना होती.

करण जोहरने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ट्विंकल खन्ना त्याच्या आयूष्यातील पहीली आणि शेवटची मुलगी आहे जी त्याला आवडली होती. त्यानंतर त्याला कोणतीही मुलगी आवडली नाही. दोघे आजही खुप चांगले मित्र आहे. इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध मित्रांमध्ये या दोघांचे नाव येते.

महत्वाच्या बातम्या –
‘बिग बॉस १४’ स्पर्धक अभिनेत्रीच्या मनात आला होता आत्महत्येचा विचार, ‘ अश्या प्रकारे केली नैराश्यावर मात!
‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीने हिंदी गाण्यावर केली भन्नाट लावणी; व्हिडिओ पाहून चाहते घायाळ
माधुरी दिक्षीतचे मेकअपशिवायचे फोटो पाहीले आहेत का? ओळखू सुद्धा येणार नाही; पहा फोटो..
अरे देवा! अभिनेते मेहमूदने एका चित्रपटात त्यांच्या सख्या बहीणीसोबत केला आहे रोमान्स

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.