बापरे! टेलिव्हिजनवरील सीता म्हणजेच दिपीका चिखलियाने केले आहे बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम

१९८७ मध्ये सुरु झालेल्या रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत सीताची भुमिका साकारुन घराघरात ओळख बनवणारी अभिनेत्री दिपीला चिखलीया ५६ वर्षांची झाली आहे. दिपीकाला आजही लोकं तिच्या सीताच्या भुमिकेसाठी ओळखतात. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही रोचक गोष्टी.

१५ वर्षापासूनच दिपीकाने अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. त्यामूळे त्यांना अभिनयाची खुप चांगली जाण होती. १९८३ मध्ये सुम मेरी लैला चित्रपटातून दिपीकाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. पण हा चित्रपट दिपीकासाठी काही खास करु शकला नाही.

दिपीकाने चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यांना खरी ओळख टेलिव्हिजनने दिली. १९८५ मध्ये दादा दादी की कहानियां मालिकेतून तिने टेलिव्हिजन विश्वास प्रवेश केला. पण दिपीला प्रसिद्धी, पैसा आणि यश रामायण मालिकेतूनच मिळाले.

रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतून दिपीकाला घराघरात ओळख मिळाली. एवढेच नाही तर लोकं दिपीकाची पुजा करु लागले. लोकांनी टेलिव्हिजनवरील सीतेला खऱ्या आयूष्यात पुजायला सुरुवात केली. रामायण मालिकेनंतर दिपीकाने अनेक मालिका आणि चित्रपट केले. पण त्यांना आजही लोकं सीता म्हणूनच ओळखतात.

रामायण मालिका तेव्हाच नाही तर आजही तेवढीच प्रसिद्ध आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये परत एकदा दाखवण्यात आली होती. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या अभिनयाच्या जोरावर मालिका जीवंत केली होती. त्यांनी निभावलेल्या भुमिका अजरामर आहेत.

दिपीका या मालिकेमूळे प्रसिद्ध तर झाल्या होत्या. पण सीतेच्या भुमिकेमूळे त्यांना करिअरमध्ये दुसरी कोणतीही भुमिका निभावता आली नाही. सीतेची इमेज मोडून अभिनयात काही तरी वेगळं करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. पण त्यांना कोणत्याही गोष्टीत यश मिळाले नाही.

खुप कमी लोकांना माहीती असेल की, दिपीकाने त्यांच्या करिअरमध्ये अनेक बी ग्रेड चित्रपट देखील केले आहेत. पण त्यांना त्यातही यश मिळाले नाही. शेवटी त्यांनी लग्न करुन अभिनयाला रामराम ठोकला आणि संसाराकडे लक्ष दिले. लग्नानंतर दिपीका यांना दोन मुली झाल्या. आज त्या आपल्या कुटूंबासोबत आनंदाने राहत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

प्रसिद्धी मिळण्याअगोदर ‘असे’ दिसत होते ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कलाकार
शुटींग संपताच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील कलाकार करतात ‘अशी’ धमाल; पहा व्हिडीओ
जाणून घ्या ७० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्री मौसमी चॅटर्जीची कहानी
‘लागीर झालं जी’ मधील साध्या भोळ्या जयडीचे हॉट फोटो व्हायरल; फोटो पाहून घायाळ व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.