शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. “मते मागताना शिवसेनेच्या बापाच्या नावाने मागू नका, तर स्वतःच्या बापाच्या नावाने मागा”, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी टीका केली होती. यावर शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.(dipak kesarkar statement on sanjy raut)
“लोक फक्त शिवसेनेच्या चिन्हावर निवडून येत नाहीत. असं असतं तर शिवसेनेच्या सर्वच सर्वजण निवडून आले असते. मते ही केवळ शिवसेनेच्या नावेच मिळत नाहीत”, असा खोचक टोला शिंदे गटात सामील असलेले आमदार दीपक केसरकर यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाची आज एक महत्वाची बैठक पार पडली आहे.
या बैठकीत शिंदे गटाच्या नवीन रणनिती आखण्याच्या संदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर म्हणाले की, “निवडणुकीत उमेदवाराचे देखील श्रम असतात. अधिक मते पक्षाची असतात. जशी ती शिवसेनेकडे आहेत, तशी ती काँग्रेसकडे आहेत, राष्ट्रवादीकडे आहेत, तशीच ती भाजपाकडेही आहेत”, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.
आमदार दीपक केसरकर पुढे म्हणाले की, “आम्ही सध्या कोणाच्याच नावावर मते मागितली नाहीत. कारण अडीच वर्षांनंतर निवडणुका आहेत. आम्ही वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेलो आहोत. फक्त शिवसेनेच्या नाही. आपल्या विधानसभेत जवळपास ८० ते १०० उमेदवार असे आहेत. जे कोणत्याही पक्षाकडून लढले तरीही ते निवडून येतील.”
” राधाकृष्ण विखे पाटील हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आधी ते काँग्रेसमधून निवडून आले, नंतर भाजपात गेले. तिथेही निवडून आले, असे उमेदवार असतात. कारण त्यांचे काम त्यांच्या मतदारसंघात, जिल्ह्यात असते. आपण त्याला चॅलेंज करू शकत नाही”, असे शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भात बोलताना आमदार दीपक केसरकर म्हणाले की, “संजय राऊत यांची बोलण्याची ही पद्धत आहे. या गोष्टीला आम्ही फारसे गांभीर्याने घेत नाही”, असे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. आज शिवसेनेच्या कार्यकारिणीची देखील बैठक झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
“मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच, मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही”
बंडखोर आमदारांचे शिवसेनेलाच आव्हान; म्हणाले, ‘मते केवळ शिवसेनेच्या नावावर मिळत नाहीत’
महिलेला होत होत्या वेदना, मांत्रिक म्हणाला, रात्री स्मशानभूमीत भेट, त्यानंतर झाला मोठा कांड