Share

Dinesh Karthik : कार्तिकच्या वडिलांचा साधेपणा पाहून मीडिया सुद्धा हैराण, कोपऱ्यात थांबून दिनेशला पाहत होते खेळताना

dinesh karthik father taking pictures | आयसीसी टी २० वर्ल्डकपला सुरुवात झालेली आहे. वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध झाला होता. त्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. खेळाडूंना खेळताना पाहण्यासाठी अनेक खेळाडूंचे कुटुंबाचे सदस्यही ऑस्ट्रेलियात आहे.

अशात दिनेश कार्तिकचे वडील कृष्ण कुमार हे त्यांच्या मुलाला वर्ल्डकपमध्ये खेळताना पाहण्यासाठी आले आहे. भारतीय संघातील सदस्य दिनेश कार्तिकचे वडील सध्या त्यांच्या साधेपणामुळे चर्चेत आहेत. ते आपल्या मुलाला भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचले होते आणि त्यावेळी कार्तिक संघासोबत सराव करत होता.

सिडनीमध्ये तो सराव करत असताना ते मुलाला भेटले नाही, कारण त्याचा सराव सुरु होता. ते तिथेच थांबले आणि मोबाईल काढून त्याचे व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. ते एका प्रेक्षकाप्रमाणे आपल्या मुलाला खेळताना पाहत होते. त्यावेळी त्यांना मोबाईलमध्ये व्हिडिओ काढू नका असे सांगण्यात आले, पण नंतर तिथल्या सुरक्षा रक्षकांना कळले की ते दिनेश कार्तिकचे वडील आहेत.

मुलाचा फिनिशरच्या रोलमध्ये पाहण्यासाठी कार्तिकचे वडील कृष्ण कुमार ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. संघ सिडनीमध्ये सराव करत होता आणि त्यावेळी त्याचे वडील आले होते. पत्रकारांना याची माहिती मिळताच ते त्यांच्या मुलाखतीसाठी पोहोचले. मात्र, यावेळी वडिलांच्या साधेपणाने सर्वांनाच प्रभावित केले आहे.

दिनेश कार्तिक अशा खेळाडूंपैकी एक आहे जो त्याच्या आई-वडिलांसोबत राहतो आणि अनेकदा त्याचे कुटुंबीयही त्याचा सामना पाहण्यासाठी येतात. कार्तिकची आईही स्टेडियममध्ये अनेकदा स्पॉट झाली आहे. मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणारा शानदार सामना पाहण्यासाठी जगभरातील चाहते जमले होते. मात्र, कार्तिकचे वडील प्रवासात असल्याने सामना पाहण्यासाठी ते पोहोचू शकले नाहीत.

पाकिस्तानविरुद्ध दिनेश कार्तिकला फक्त १ धाव करता आली होती. पण त्याने यष्टीरक्षण करताना खुप चांगली कामगिरी केली होती. त्याने संघाच्या अनेक धावाही वाचवल्या होत्या. आता भारतीय संघाचा पुढचा सामना नेदरलँड्सविरुद्ध असणार आहे. या सामन्यात त्याला स्थान मिळते का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत, आमदारांसोबत मिळून घेतला ‘हा’ मोठा निर्णय
bachchu Kadu : १ तारखेपर्यंत पुरावे द्या, नाहीतर १२ आमदारांसोबत मी…; राणांच्या आरोपांवरून बच्चू कडू भडकले
uddhav thackeray : दिवाळीच्या मुहूर्तावर राजकीय भूकंप होणार? शिंदे गटाने दिल्या ठाकरे गटाला शुभेच्छा, अन्..

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now