डिंपल कपाडियाच्या आईला मान्य नव्हते मुलगी डिंपल आणि राजेश खन्नाचे लग्न

राजेश खन्ना बॉलीवूडचे पहीले सुपरस्टार होते. त्यांच्यासारखे स्टारडम दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याच्या नशिबात अजूनही आले नाही. म्हणूनच बॉलीवूडच्या सुपरस्टारचा ताज आजही त्यांच्या नावावर आहे. चित्रपटांसोबतच ते त्यांच्या वैयक्तिक आयूष्यामूळे देखील लोकांसाठी चर्चेचा विषय होते.

राजेश खन्नाने अभिनेत्री डिंपल कपाडियासोबत लग्न केले होते. दोघांचे लग्न त्याकाळी चर्चेचा विषय होता. त्यामागे अनेक कारण होती. अनेकांचे म्हणणे होते राजेश खन्ना गर्लफ्रेंडला जळवण्यासाठी डिंपलसोबत लग्न करत होते. लोकांना वाटत होते हे लग्न जास्त काळ टिकू शकणार नाही.

यासोबतच आणखी एक कारण होते ज्यामूळे हे लग्न खुप जास्त चर्चेत आले होते. ते कारण म्हणजे राजेश खन्ना आणि डिंपलमधले वयाचे अंतर. दोघांमध्ये अनेक वर्षांचे अंतर होते. डिंपल काकांपेक्षा १५ वर्षांनी छोट्या होत्या. हिच गोष्ट त्यांच्या अनेकांना समजली नाही.

याच कारणामूळे डिंपलची आई बिट्टी कपाडीया देखील खुप दुखी होत्या. त्यांना हे लग्न मान्य नव्हते. तर दुसरीकडे डिंपलचे वडील सुपरस्टार जावाई मिळाल्यामूळे खुप आनंदी होते. डिंपलचे लग्न झाले त्यावेळी त्यांचे वय १६ वर्ष होते. तर राजेश खन्नाचे वय ३१ वर्ष होते.

दोघांमधले वयाचे अंतर बिट्टी कपाडीयासाठी चिंतेचा विषय बनला होता. त्यांनी या लग्नाला विरोध केला होता. पण त्यांचे कोणीही ऐकले नाही. त्यांनी डिंपल आणि राजेश खन्नाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.

१९७३ मध्ये धुमधडाक्यात राजेश आणि डिंपलचे लग्न झाले. डिंपलचे फेरे सुरु होते त्यावेळी त्यांच्या आई रडत होत्या. त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होते की, हे लग्न होऊ नये. पण त्यांचे कोणीही ऐकले नाही आणि लग्न झाले. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. राजेश आणि डिंपल लवकरच वेगळे झाले.

महत्वाच्या बातम्या –
‘विरासत’ चित्रपटातील अभिनेत्री पुजा बत्राने केले आहे खलनायकासोबत लग्न; पहा फोटो
चित्रपट क्षेत्रात नसणारा अशोक सराफ व निवेदिता यांचा मुलगा नक्की करतो तरी काय? जाणून घ्या
भारतीय महिला सार्वजनिक ठिकाणी शारीरीक संबंध का ठेवत नाही?, ऐश्वर्याने दिले ‘असे’ उत्तर
‘लागीर झालं जी’ मधील साध्या भोळ्या जयडीचे हॉट फोटो व्हायरल; फोटो पाहून घायाळ व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.