दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला अनेक बॉलीवूड कलाकारांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे.
यामध्ये दिलजीत डोसांझ यानेसुद्धा सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. सध्या तो खूप चर्चेत आहे. शनिवारी त्याने सिंधू सीमेवर शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना थंडीत मदत व्हावी यासाठी त्याने १ कोटी रुपयांची ब्लॅंकेट्स वाटली.
यावेळी तो म्हणाला की, आमची केंद्राला एकच विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करावी. सर्व लोक याठिकाणी शांततेत बसले आहेत आणि संपूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे.
तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार, शेतकऱ्यांनी नवा इतिहास रचला आहे आणि हा इतिहास पुढच्या ययेणाऱ्या पिढ्यांना सांगितला जाईल. आज मी याठिकाणी बोलण्यासाठी नाही तर ऐकण्यासाठी आलो आहे. पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांचे आभार.
आपण पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. तसेच तो मजेत म्हणाला की, मी आज हिंदीत बोलत आहे जेणेकरून कोणाला माझे बोलणे गुगल करण्याची गरज पडणार नाही. याठिकाणी शेतकऱ्यांशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट होत नाही. त्यामुळे हा विषय भरकटवू नका.
सरकारने सर्व मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. कोणत्याही हिंसेची इथे चर्चा होत नाही. ट्विटरवर बऱ्याच गोष्टी बोलल्या जात आहेत आणि विषयाला भरकटवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे दिलजीत यावेळी म्हणाला.
महत्वाच्या बातम्या
डॉक्टरांनी इंजेक्शन देऊनही कधी बाळ खुदूखुदू हसताना पाहीले आहे का? मग हा व्हिडिओ बघाच
रेनॉ कंपनीची भन्नाट ऑफर; फक्त १४०३ रुपयांच्या हप्त्यावर घरी घेऊन या रेनॉ क्वीड