मुंबई । सध्या देशात कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक झाला आहे. यासाठी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. तर काहींनी टीका केली आहे.
आता या आंदोलनावरून अभिनेत्री कंगना रणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने शेतकरी आंदोलनाचा ना केवळ विरोध केला तर एका वृद्ध महिलेविरोधात फेक ट्वीट करत अपशब्द वापरले आहेत.
यामुळे कंगनाच्या या भूमीकेवर गायक दिलजीत दोसांजने टीका केली आणि शेतकऱ्यांची माफी मागण्याचा सल्ला दिला आहे. यावरून त्यांच्यात ट्विटर शाब्दिक चकमक उडत आहे.
Tuneh Jitne Logon Ke Saath Film Ki Tu Un Sab Ki Paaltu Hai…?
Fer To List Lambi Ho Jaegi Maalko Ki..?Eh Bollywood Wale Ni PUNJAB Wale aa .. Hikk Te Vajj Sadey
Jhooth bol kar logo ko badhkana aur emotions se khailna woh toh aap achey se janti ho..😊 https://t.co/QIzUDoStWs
— DILJIT DOSANJH (@diljitdosanjh) December 3, 2020
यामध्ये एका वृद्ध महिलेविरोधात फेक ट्वीट करत अपशब्द वापरल्यानंर दिलजीतने कंगनावर टीका केली. कंगनाने त्याचा उल्लेख करण जोहरचा पाळतू असा उल्लेख केला. यावर दिलजीतने देखील प्रत्युत्तर देताना तू देखील बॉलिवूडची पाळीव प्राण्यासारखीच आहेस असे म्हटले आहे.
या दोघांमध्ये ट्वीटर वॉर रंगले आहे. कंगना गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या बाजूने आपली भूमिका मांडत आहे. यावरून तुच्यावर सतत टीका केली जात आहे. याप्रकरणी दिलजीतला अनेकांनी पाठींबा दिला आहे.
Toh Bhai Aaj Ka Last Tweet @KanganaTeam Yeh Paltu Mashoor Hai Chatne Mai Aur Mudey Ko Divert Karne Mai..
Mudda Kisaani Da aa Te Asi Sare Kisaan’an De naal an. PEACEFUL TAREEKE Naal🙏🏾
PUNJAB dian Maava Ton Maafi Mang Li Je KARMA THEEK KARNA AN TAN#FarmerProtest
— DILJIT DOSANJH (@diljitdosanjh) December 3, 2020
पुढे कंगनाने पुन्हा ट्वीट करत दलजीतवर निशाणा साधला. ‘ए चमच्या, माझ्यावर टीका करू नकोस. तू ज्यांच्याकडे काम मागतोस, त्यांच्यावर मी रोज टीका करते. मी तुझ्यासारखी कोणाची चमची नाही. मी फक्त शाहीन बाग आंदोलनकर्त्यांवर माझे मत मांडले होते. याशिवाय कोणी काही सिद्ध केले तर मी त्यांची माफी मागेल.
याला दिलजीतने उत्तर देत शेतकऱ्यांची माफी मागण्याचा कंगनाला सल्ला दिला आहे. दिलजीत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, थोडे फार चांगले कर्म करण्याची इच्छा असेल तर पंजाबच्या प्रत्येक आईची कंगनान माफी मागितली पाहिजे. यावरून आता शेतकरी आंदोलन चांगलेच पेटल्याचे दिसत आहे.