प्रशासकिय कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही; नव्या गृहमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दिलं आश्वासन!

मुंबई : राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे आभार मानले.

यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘पोलीस दलाचं सक्षमीकरण करण ही एक महत्वाची बाब आहे. त्या दृष्टीने पावलं टाकणं आवश्यक आहे. स्वच्छ प्रशासन देण्याच्या दृष्टीने माझं काम राहील. प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप माझ्याकडून राहणार नाही,’ अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार आव्हान देणार असल्याची माहिती यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

“उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, सीबीआय-एनआयएची चौकशी यामध्ये राज्य सरकारचं पूर्ण सहकार्य राहील. मात्र, न्यायालयाच्या निकालाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे”, असेही ते म्हणाले.

‘कोरोनाचं संकट असताना याच महिन्यात गुढी पाडवा आहे, रमजान आहे, महावीर जयंती आहे, आंबेडकर जयंती आहे. प्रत्येक वर्गाच्या अपेक्षा असतात. कोरोनाचा अंदाज पहिला तर या महिन्यातील परिस्थिती आव्हानात्मक असणार आहे. गृह विभागाकडून महिलांनाही मोठ्या अपेक्षा असतात. त्या देखील पूर्ण करण्याचा पोलीस दलाकडून प्रयत्न केला जाईल,’ असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

“पवारसाहेब, दुसऱ्याचे हात बांधलेले नसतात, खुनाचं उत्तर खुनानं चांगलं दिसणार नाही”

अजब प्रेमकी गजब कहाणी! पोरगाच बनला बापाचा साडू, मावशीसोबत पळून जाऊन केले लग्न

कालच्या बैठकीत उद्धव ठाकरेंशी राज ठाकरे काय बोलले? स्वत: राज ठाकरेंनीच केलं जाहीर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.