दिलीप वळसे पाटील होणार महाराष्ट्राचे नवीन गृहमंत्री?

मुंबई : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अवघ्या काही तासांत गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. विरोधी पक्षांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे केली होती. यानंतर आता नवीन गृहमंत्री कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या गोटातून सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे हेदेखील या पदासाठी स्पर्धेत आले. मात्र गृहखात्यावरून मोठा गदारोळ झाला असल्याने शरद पवार हे आणखी कोणतीही रिस्क घेणार नसल्याची माहिती मिळत आहे.

यामुळे गृहमंत्रिपदासाठी आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचं नाव चर्चेत आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार आणि राष्ट्रवादीकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे. वळसे पाटलांकडील उत्पादन शुल्क खाते अजित पवारांकडे दिले जाण्याची शक्यता आहे.

दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे विश्वासू नेते आहेत. तसेत त्यांची प्रतिमाही स्वच्छ आहे. तसेच ते मिडीयाशी जास्त बोलतही नाहीत. ह्या बाजू त्यांच्या जमेच्या आहेत. असं म्हटलं जातय की शरद पवारांची पहीली पसंती वळसे पाटलांनाच आहे.

मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. गृहमंत्र्यांनी दरमहा १०० कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला होता.

अखेर परमबीर सिंह यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. पोलीस आयुक्त पदावरुन हटवून गृह रक्षक दलामध्ये बदली केल्याविरोधात परमबीर सिंह यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराची निःपक्षपाती आणि योग्य सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.

त्यांच्या याचिकेतील मुद्दे मान्य करत अखेर हायकोर्टाने अनिल देशमुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. १५ दिवसांत चौकशी पुर्ण करून याप्रकरणाचा योग्य निर्णय सीबीआय संचालकांना घ्यायचा आहे.

ह्या चौकशीनंतर अनेक घडामोडी व गौप्यस्फोट बाहेर येण्याची शक्यता आहे. आजपर्यंत अनिल देशमुखांच्या चौकशीला नकार देणारी महाविकास आघाडी देखील हायकोर्टाच्या या निर्णयाने अडचनीत आली आहे. तर अनिल देशमुखांचा पाय देखील आणखी खोलात जात आहे.

थेट गृहमंत्र्यांवर वसुलीचा आरोप केल्याने व त्याच्या सीबीआय चौकशीची मागणी हायकोर्टाने मान्य केल्याने महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.

याप्रकरणी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे की राजीनामा देण्याचा निर्णय अनिल देशमुख यांनी स्वताच घेतला आहे. नैतीकतेच्या आधारावर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सीबीआय चौकशी सुरू असताना गृहमंत्री पदावर राहणे त्यांना योग्य वाटत नव्हते असे नवाब मलिक यांनी सांगीतले.

महत्त्वाच्या बातम्या
अखेर विकेट पडलीच! अनिल देशमुखांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा; कारणामुळे राजीनामा दिला

रोखठोकमधून संजय राऊतांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना झोडपले; थेट लायकीच काढली
“अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव”
आघाडीत बिघाडी: आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशावरून नाराज काँग्रेस राज्यपालांकडे जाणार

माझ्या औषधाला परवानगी द्या, कोरोना झटक्यात बरा करतो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.