आज ईडीने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईचे समर्थन करत भाजप नेत्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे.(dilip valse patil create SIT for ed officers investigation)
काही दिवसांपूर्वी शिवसेना(Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत ईडीच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दखल घेतली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे.
त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या एसआयटीमार्फत आरोप असलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
पत्रकारांशी संवाद साधत असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसआयटी संदर्भात माहिती दिली आहे. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “सध्या भडकाऊ भाषणे करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्याच्या एकतेच्या दृष्टिकोनातून ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या प्रकरणावर आमचं लक्ष आहे.”
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या मशिदींवरील भोंग्याच्या विधानाचा देखील समाचार घेतला. समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशा शब्दांत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सुनावले आहे.
शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याच्या विरोधात विधान केलं होतं. तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. यावर भाजपव्यतिरिक्त इतर पक्षांनी राज ठाकरे यांच्या विधानाचा विरोध करत टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या :-
३८ पैशांच्या शेअरने एका वर्षात दिला १५ हजार टक्क्यांपेक्षा जास्त परतावा, १ लाखाचे झाले १.५८ कोटी
तासंतास खुर्चीवर बसताय? या सवयीने २०-३० वर्षात तुमच्या शरिराची लागेल वाट, होतील ‘हे’ वाईट परिणाम
शेर शिवराजमध्ये अफजल खानाच्या भूमिकेत दिसणार बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक; First Look आला समोर