दिलीप कुमारच्या त्या डॉयलॉगचे कोरोना कनेक्शन; पहा दिलीप कुमारांचा व्हायरल व्हिडिओ

कोरोनाच्या संकटात काही लोक मदतीला धावून येत आहे, तर काही लोक या संकटाचा गैरफायदा घेत आहे. पैशाच्या हव्यासापोटी अनेक धक्कादायक कृत्य लोक करत आहे.

अनेक लोक संधीचा गैर फायदा घेत औषधे जास्त किंमतीला विकत आहे, तर अनेक लोक रुग्णांच्याच नाही, तर कोरोनामुळे मृत्यु झालेल्या लोकांच्या खिशातूनही पैसे चोरत असल्याच्या धक्कायदायक घटना घडल्या आहे. त्यामुळे माणूसकी मेली की काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक जण भावूक झाले आहे. व्हिडिओ सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारा आहे. कॉमेडियन कुणाल कामराने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सध्या काळाबाजार, गरजू लोकांची लूटमार होत आहे. अनेक लोक उपचाराअभावी मरत आहे. तसेच काळाबाजार करणाऱ्या लोकांवर जेव्हा पोलिस कारवाई करण्यासाठी जातात, तर लोकं ते औषधं नाल्यांमध्ये फेकत आहे. या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आहे. बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांचा हा व्हिडिओ आहे.

लोक भुकेने मरत होते, तेव्हा आपण अन्न जास्त किंमतीत विकून खिशे भरत होतो. शहरात आजार पसरला तेव्हा आपण औषधं चोरली, ती जास्त किंमतीला विकली. जेव्हा पोलिस कारवाई करण्यासाठी आले तेव्हा लोकांचे जीव वाचवणारी औषधं नाल्यांमध्ये फेकली, माणसाच्या गोष्टी माणसाच्या कामीच येऊ दिल्या नाही, असे दिलीप कुमार यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आह.

दिलीप कुमारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कुणाल कामराने शेअर केलेल्या या व्हिडिओला १ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तर १३ हजार लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने आपल्या लग्नात जे केलं ते वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल
मोठी बातमी! अभिनेत्री कंगना रणावतला कोरोनाची लागण, स्वतः दिली माहिती
पवार, ठाकरेंचे विकृत फोटो पोस्ट करणाऱ्या फडणवीस फॅन क्लब व कोमट बॉईज अँड गर्ल्स ग्रुपवर गुन्हा दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.