आमचा ट्रायो तुटला… ; सहकलाकाराच्या जाण्याने हळहळलेल्या जेठालालने लिहीली भावूक पोस्ट

बॉलिवूड अभिनेता अमित मिस्त्रीचे शुक्रवारी निधन झाले आहे. कार्डियक अरेस्टने अमितचा मृत्यु झाला आहे. अमित अनेक हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमितच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

अमितच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी तारक मेहता का उल्टा चष्मामधले जेठालाल म्हणजेच दिलीप जोशीनेही अमित मिस्त्रीला श्रद्धांजली वाहिली आहे.

दिलीप जोशीने सुमित राघवण आणि अमितसोबत २००४ मध्ये आलेल्या शुभ मंगल सावधान या चित्रपटात काम केले होते. त्यामधलेच फोटो शेअर करत दिलीप जोशीने एक पोस्ट लिहिली आहे. आमचा ट्रायो आज तुटला आहे. पण आठवणी नेहमीच सोबत असतील. मी जेवढं बोलतोय, त्यापेक्षा जास्त तो माझ्या आठवणीत राहील. तो एक खुप चांगला माणूस होता.

त्याच्या सोबत काम करत असताना हे जाणवायचे, की तो त्याचा अभिनय खुप मन लावून करायचा. मला वाटलेही नव्हते, की मी त्याच्यासाठी असे काही लिहिल. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो, अशी फेसबुक पोस्ट दिलीप जोशीने शेअर केली आहे.

तसेच बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठीनेही अमितच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे. अमितच्या निधनाची बातमी खुप दुखद आहे. गेल्या महिन्यातच आम्ही एका सीनवर काम करत होतो. पण वाटले नव्हते की असे काही होईल. भावपुर्ण श्रद्धांजली, असे पंकज त्रिपाठीने म्हटले आहे.

दरम्यान,तेनालीराम, सात फेरो की हेरा फेरीसारख्या शोमध्ये अमितने काम केले आहे. तर एक चालीस की लास्ट लोकल, ९९, शोर इन द सिटी, ए जेंटलमन या चित्रपटात आणि ऍमेझॉन प्राईमच्या बंदीश बँडिट्स या वेब सिरिजमध्येही त्याने काम केले होते.

महत्वाच्या बातम्या-

अनिल देशमुख आता पुरते अडकले! मुंबई नागपुरातील घरांवर सीबीआयने टाकले छापे
..तर राजकारणात मोदींना उद्धव ठाकरेंचा आदर्श ठेवावा लागेल! प्रसिद्ध राजकीय विश्लेषकाचे मत
‘सॉरी..माहित नव्हतं कोरोना लसी आहेत’; चिठ्ठी लिहून चोरलेल्या लसी चोरट्यांनी आणून दिल्या परत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.