प्रेमभंगात भाईचा दिलजले झाला! खचून न जाता सुरू केला दिल टूटा आशिक कॅफे; आता नुसता राडा सुरूय

प्रेम ही भावनाच सुंदर आहे. प्रेम करावे पण ते योग्य व्यक्तीवर करावे असे बोलले जाते. आपले प्रेम असलेली व्यक्ती शेवटपर्यंत साथ देतेच असं नाही. काही वेळेस मधूनच आपल्याला सोडून जाते. मग त्यानंतर आपण एकटे पडल्यावर आपन चुकीच्या मार्गाला लागतो. मग व्यसन करणे, चिडचिड करणे, नेहमी ताणतणावात राहणे, त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात बदला घेण्याची भावना निर्माण होते अशा गोष्टी करत असतो.

प्रेमभंग झाल्यावर अनेकजण चुकीची पावलं उचलत असतात. आपल्याला अशा घटना ऐकायला मिळतात. पण उत्तराखंडमधील देहरादूनमध्ये एका  तरूणाने प्रेमभंग झाल्यावर स्वत:ला त्रास करूण न घेता ‘दिल टूटा आशिक’ नावाने कॅफे सूरू केला आहे. सध्या सोशल मिडियावर या कॅफेची चर्चा होत आहे.

२१ वर्षीय दिव्यांशु एका मुलीच्या प्रेमात पडला होता. खुप दिवस त्या मुलीच्या सोबत राहिल्यावर त्याला तिची सवय होऊन गेली. पण एके दिवशी त्या मुलीने त्याला धोका दिला आणि मग दिव्यांशु पूर्ण खचून गेला. ६ महिने तो सतत ताणतणावात होता. तो नेहमी मोबाईलवर गेम खेळत राहत असे. घरच्यांनी अनेकवेळा त्याची समजुत घातली पण तो कुणाचंही ऐकणच्या मनस्थितीत नव्हता. मात्र अचानक त्याच्यात बदल झाला आणि त्याने कॅफे उघडण्याचं ठरवलं. त्याने आपल्या कॅफेचं नाव ‘दिल टूटा आशिक’ असं ठेवलं.

दिल टूटा आशिक नाव पाहून ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागले. ग्राहक दिव्यांशू सोबत फोटो काढत आहेत. सोशल मिडियावर तर याच कॅफेचीच चर्चा होत आहे. ग्राहकांना सुद्धा दिव्यांशु प्रेमाने बोलून कॅफे उघडण्याचं कारण सांगत आहे.

दिव्यांशू तरूणांना सांगत आहे की तुम्ही प्रेम करा. प्रेम करणे चुक नाही. प्रेमात जर धोका भेटला असेल तर निराश होऊन न जाता जगण्याची नवीन सूरूवात केली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या-
घटस्फोटासाठी ६ महीनेसुद्धा वाट पाहण्याची गरज नाही; वाचा उच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल
शौचालयात जाताना मोबाईल घेऊन जाताय; आताच सोडा ही सवय नाहीतर होतील ‘हे’ गंभीर आजार
‘बाळासाहेबांनीच भाजपला गावखेड्यात पोहचवले, भाजपच्या अस्तित्वाचे श्रेय त्यांनाच’
तेव्हा बाळासाहेब अमिताभला म्हणाले, मी बघतोच कोण तुमचा चित्रपट रिलीज होऊ देत नाही

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.