‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीचा विवाह झाला संपन्न; नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता

गेल्या वर्षभरापासून सर्वच गोष्टींची घडी विस्कटली गेली आहे. कोणत्याच प्रकारच्या कार्यक्रमांचे नियोजन व्यवस्थीत होत नाही, त्यामध्ये लग्न, सण, यात्रा यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश होतो. तरीही नियम व अटी लक्षात घेऊन कार्यकम पार पाडले जातात. यामध्ये मनोरंजन श्रुष्टीचाही समावेश पाहायला मिळतो.

गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकारांचे लग्न झालेले पाहायला मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीत एका पाठोपाठ एक साखरपुडा व विवाह सोहळे झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, अर्चना निपाणकर, तेजपाल वाघ, कार्तिकी गायकवाड, अभिज्ञा भावे, मानसी नाईक यांचा समावेश होता. आता या यादीत आणखीन दोन मराठी कलाकारांचा समावेश झाला आहे.

काहीच महिन्यांपूर्वी संपलेली मालिका ‘ तुझ्यात जीव रंगला ‘ या मालिकेतील अभिनेत्री ऋचा आपटे आणि सुपरहिट चित्रपट ‘ मुळशी पॅटर्न ‘ फेम अभिनेता क्षितीज दाते यांचा २५ एप्रिल २०२१ रोजी विवाह संपन्न झाला. गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता.

ऋचा व क्षितीज यांच लग्न गेल्याच वर्षी होणार होत, परंतु काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घरातील काही मोजक्याच माणसांच्या  उपस्थित हा लग्नसोहळा पार पडल्याचे समजते. अनेक कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून दोघांना शुभेच्छा दिल्या.

ऋचा आपटे हिने खूपच गाजलेली मालिका ‘ दिल दोस्ती दुनयादारी ‘ या मालिकेतही काम केले होते. या मालिकेत तिने सुजयच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तसेच ती सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘असं माहेर नको ग बाई ‘ या मालिकेत दिसून येत आहे. तसेच क्षितीज दाते यानेही अनेक मालिकांमध्ये काम केलेले पाहायला मिळाले.

ऋचा आणि क्षितीज यांनी झी युवा वरील  ‘ बन मस्का ‘ या मालिकेत एकत्र काम केले. या मालिकेच्या शुटींग दरम्यान त्यांच्या लव स्टोरीला सुरवात झाली. ऋचा आणि क्षितीज दोघेही अतिशय उत्तम कलाकार आहेत. ऋचा आपटे व क्षितीज दाते या दोघांना वैवाहिक आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा.

हे ही वाचा –

कोरोना खरंच आलाय का पैशांसाठी नाटकं सुरू आहे?; प्रसिद्ध अभिनेत्रीचा सरकारला सवाल

आनंदाची बातमी! या तारखेला महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर संपणार; टास्क फोर्सने दिली माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.