शशांक केतकरच्या बहिणीचे छोट्या पडद्यावर पदार्पण, ‘या’ मालिकेत साकारणार मुख्य भूमिका

मुंबई | अभिनेता शशांक केतकरची लहान बहीण छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. अभिनेता शशांक केतकर ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेसह अनेक लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळला होता. यानंतर त्याची बहीण एका नव्या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

सोनी मराठी या वाहिनीवर नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेचा प्रोमो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या मालिकेतून शशांक केतकरची धाकटी बहीण दिक्षा केतकर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दिक्षाच्या या नव्या मालिकेचे नाव ‘तू सौभाग्यवती हो’ असे आहे. दिक्षाची ही पहिलीच मालिका आहे. यामध्ये ती ‘ऐश्वर्या’चे प्रमुख पात्र साकारताना दिसणार आहे. दिक्षासोबत या मालिकेत हरीश दुधाडे, ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरु दिवेकर आणि प्रिया करमरकर हे कलाकार आहेत.

दिक्षाची ही पहिलीच मालिका असल्याने ती तिच्या भूमिकेबाबत उत्सुक दिसत आहे. मराठी सृष्टीत शशांक केतकर चांगलाच लोकप्रिय आहे. आता त्याची बहीण तिची नवी ओळख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. यानिमित्ताने नव्या मालिकेतील नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ही मालिका दिक्षासाठी खास आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
‘आपके प्यार मैं’ गाण्यात हॉटनेसने आग लावणारी अभिनेत्री मालिनी शर्मा आज करते ‘हे’ काम
मेकअपशिवाय ‘अशी’ दिसते तब्बू; फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का
पुजा हेगडेने मुंबईमध्ये खरेदी केला स्वतः चा आशियाना; पहा घराचे फोटो
रोहित शेट्टीचे पितळ पडले उघडे! ‘असे’ शूट होतात चित्रपटातील कार स्टंट, पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.