बॅटरीच्या प्राॅब्लेममुळे वैतागलेत इलेक्ट्रीक वाहन खरेदी केलेले लोक; वाचा नेमकं काय घडतय..

मुंबई | देशात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रीक वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिक इलेक्ट्रीक वाहन खरेदीसाठी बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. परंतु इलेक्ट्रीक वाहन सर्वसामान्य व्यक्तीने खरेदी करताना आणि खरेदी केल्यानंतर त्यांना काही संकटे आणि अडचणी येत आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयकडून, तसेच या खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून इलेक्ट्रीक वाहनांचा गाजावाजा होत आहे. पारंपारिक इंधानाचा भविष्यातील तुटवडा आणि वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी ई-वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे.

दुसरीकडे मात्र इलेक्ट्रीक वाहनांची मागणी कमी असल्याने उत्पादन कमी आणि ‘उत्पादन कमी असल्याने किंमत जास्त’ या चक्रव्यूहात इलेक्ट्रिक वाहने अडकली आहेत. पेट्रोल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रीक वाहनांची किंमत जादा किंवा दुप्पट आहे.

इलेक्ट्रीक वाहनांना पावरसह गती देण्यासाठी बॅटरी खूप महत्वाचा भाग आहे. या बॅटरी जवळपास दोन वर्षांत खराब होऊन जातात अशी तक्रार वारंवार समोर येत आहे. म्हणजे वाहन खरेदी करण्यासाठी जादा पैसे द्यायचे आणि नंतर बॅटरी बदलण्यासाठी आणखी पैसे मोजायचे अशा संकटात ग्राहक सापडत आहे.

याशिवाय सर्वात मोठा प्रश्न विश्वासाहार्यतेचा आहे. इलेक्ट्रीक वाहन प्रथमच वापरण्यासाठी ग्राहकांच्या मनात शंका आहेत. तसेच नव्या स्टार्टअपवर विश्वास ठेवण्यासाठी ग्राहक सहज तयार होत नाहीत. मोठ्याप्रमाणात दुचाकी गाड्या नव्या कंपन्याच बनवत आहेत.

इलेक्ट्रीक वाहनांकडे पाहण्याची लोकांची नकारात्मक भावना आहे. वाहन चालवताना लोकांच्या मनात अनेक शंका उपस्थित होत आहेत. यामध्ये वाहनांची रेंज किती असेल, चालवताना रस्त्यातच त्याची चार्ज संपणार तर नाही ना. असे सवाल मनात आहेत. या वाहनांची चार्ज हवी तेव्हा कशी करणार या गोष्टी दूर होत नाहीत तोवर लोक पेट्रोलच्या गाड्या खरेदी करतील.

देशाचा आकार मोठा आहे. छोट्या शहरांमध्ये इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन, डीलरशीप आणि सर्व्हिसिंग सेंटर मोठ्या प्रमाणावर खोलण्याची गरज आहे. सरकारकने अद्याप मोठ्या शहरात हे उभारून शकलेली नाही. याशिवाय ग्राहकांना गाड्या खरेदी करण्यासाठी योग्य लोन किंवा फायनान्सचा पर्याय मिळत नाही. केंद्र आणि राज्या सरकारची सबसिडी इलेक्ट्रीक वाहन खरेदीसाठी प्रोत्साहन ठरेल.

वरील अडचणी दूर केल्यास इलेक्ट्रीक वाहन खरेदीची संख्या नक्कीच वाढणार आहे. तसेच पेट्रोलवर होणारा वैयक्तिक खर्च कमी होणार आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशावर पडणार आर्थिक भार कमी होईल. याशिवाय भविष्यात हे पर्यावरणासाठी महत्वाचे ठरणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.