Share

अध्यात्माच्या मार्गाला लागलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखणं देखील झालं कठीण; फोटो व्हायरल

मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी आपले करिअर सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. टेलिव्हिजन वरील लोकप्रिय हिंदी मालिका ‘अनुपमा’ मध्ये नंदिनीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अनघा भोसले(Angha Bhosale) हीने देखील मनोरंजन क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे अभिनेत्री अनघा भोसले ‘अनुपमा’ या हिंदी मालिकेत दिसणार नाही.(difficult to recognize a Marathi actress who was on the path of spirituality; Photo viral)

तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी मार्च महिन्यात अभिनेत्री अनघा भोसले हीने सोशल मीडियावर पोस्ट टाकत अध्यात्माचा मार्ग स्वीकारल्याची माहिती दिली होती. यादरम्यान अभिनेत्री अनघा भोसलेचे काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री अनघा भोसलेचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये अभिनेत्री अनघा भोसले हीने संन्यासीचा पेहराव केला आहे. अभिनेत्री अनघा भोसले हिने साडी घातली असून माथ्यावर टिळा लावला आहे. तसेच अनघा भोसले हीने गळ्यातील कापडी पिशवीमध्ये जपमाळ ठेवली आहे. या पेहरावामुळे अभिनेत्री अनघा भोसले हिला ओळखणे देखील कठीण झाले आहे.

ग्लॅमरची दुनिया सोडून अभिनेत्री अनघा भोसले साध्या पद्धतीने आयुष्य जगत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री अनघा भोसले हीने हातामध्ये आंबे घेतले आहेत. अभिनेत्री अनघा भोसले हीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला अनेक लोकांनी लाइक केले आहे.

अनेक युजर्सनी या फोटोवर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.अभिनेत्री अनघा भोसले सध्या गोवर्धन इकोव्हिलेजमध्ये वास्तव्यास आहे. ती कृष्ण भक्तीत लीन झाली आहे. अभिनेत्री अनघा भोसले सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत असते.

नुकताच अभिनेत्री अनघा भोसले हीने गायीच्या वासरूसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनघा भोसले हीने अचानक टेलिव्हिजन इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. “अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी मी टेलिव्हिजन क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही माझ्या निर्णयाचा आदर कराल. मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे”, अशा आशयाची पोस्ट करत अनघा भोसले हीने ‘अनुपमा’ मालिका सोडली होती.

महत्वाच्या बातम्या :-
आम्रपाली दुबेच्या हनीमूनचा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का? शिल्पी- विजय चौहानचेही आहे खास कनेक्शन
प्रसिद्ध अभिनेत्रीने बाळासोबत केले विचित्र कृत्य; संतापलेले नेटकरी म्हणाले, बाळ काय खेळणं वाटलं?
सोमय्यांवरील हल्ल्यावेळी Z सेक्युरिटी कुठे होती? जाब विचारणाऱ्या CISFला आयुक्तांकडून जशास तसे उत्तर

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now