पुरूषांनो! आपली से’क्स लाईफ सुधरवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

महिलांना जसे पोषक तत्वे महत्वाचे असतात तसेच पुरूषांनादेखील काही खास पोषक तत्वांची गरज असते. पुरूषांना इरेक्शन आणि से’क्ससंबधिंत खुप समस्या असतात. पुरूषांना प्रोस्टेट कॅंसर सारख्या गंभीर आजारांचा धोका असतो.

काही अन्नपदार्थ पुरूषांच्या से’क्स लाईफला सुधरवतात. याने रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते. तसेच याने आपली बॉडी फिट राहते. आज आपण याच गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

१) फॅटी फिश- सैल्मन, हेरिंग, सार्डिन आणि हलिबेट सारखे मासे फॅटचा खुप मोठा स्त्रोत आहे. यामध्ये असलेले ओमेगा ३ फॅटी ऍसिड ह्रद्याच्या आजारांसाठी खुप फायदेशीर असते. एका शोधानुसार स्त्रीयांपेक्षा पुरूषांना हार्टचे आजार होतात.

२) चॉकलेट- जर तुम्ही योग्य प्रमाणात चॉकलेट खाल्ले तर तुमचे रक्ताभिसरण सुरळीत होते. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवनॉल जास्त प्रमाणात असते. यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी होते. यामुळे ब्लड प्रेशर प्रमाणात राहते.

३) अदरक- अदरकमध्ये एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. व्यायाम करताना बऱ्याच पुरूषांच्या स्नायुंमध्ये ताण येतो. यामुळे स्नायु दुखतात. अदरकामुळे तुम्हाला या त्रासापासून मुक्ती मिळते आणि सुजही कमी होते.

४) दुध आणि दही- दुध आणि दह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ल्युटिन असते. हे अमिनो ऍसिड विशेष करून मसल्स बनवण्यासाठी खुप फायदेशीर असतात. दह्यामध्ये प्रोटीन, पोटेशियम आणि चांगले बॅक्टेरीया असतात. हे आतड्यांना स्वस्थ ठेवतात.

५) सोया फुड्स- एका अभ्यासानुसार सोया फुड्स हे पुरूषांमध्ये होणाऱ्या प्रोस्टेट कॅसरपासून वाचण्यासाठी खुप प्रभावी आहे. पुरूषांनी आपल्या डाएटमध्ये सोयाबीन, टोफू, मीसो सुप आणि सोया दुध या खाद्यपदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.

६) नारंगी भाज्या- नारंगी भाज्यांमध्ये बीटा-केरीटीन, ल्यूटीन आणि व्हिटामीन सी भरपूर प्रमाणात असते. हे पोषक तत्व आपल्या शरीरातील प्रोस्टेटला कमी करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये गाजर, भोपळा, रताळे आणि लाल शिमला मिरची या भाज्यांचा समावेश करणे गरजेचे आहे.

या सगळ्या गोष्टींचा समावेश पुरूषांनी आपल्या आहारात केला पाहिजे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला भेट द्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.