ट्रेनला एक किलोमीटरसाठी किती डिझेल लागते? वाचून आश्चर्यचकित व्हाल

भारतीय रेल्वे देशातील प्रवास करण्याचे एक प्रमुख माध्यम आहे. रेल्वेमुळे भारताचा विकास खुप झपाट्याने झाला. दळणवळणाचे प्रमुख माध्यम म्हणजे रेल्वे. मुंबईकर तर रेल्वेशिवाय जगूच शकणार नाहीत. आपण लांबचा पल्ला गाठण्यासाठी ट्रेनचाच वापर करतो.

मध्यमवर्गीय लोकांसाठी ट्रेन हे खुप महत्वाचे साधन आहे. पण इतर वाहनांच्या तुलनेत प्रवास खर्च खुप कमी लागतो. तुमच्या माहितीसाठी या ट्रेनला एक भलेमोठे इंजिन जोडलेले असते. हे इंजिन खुप शक्तीशाली असते.

या इंजिनच्या साहाय्याने इंजिनला जोडलेले डबे ट्रेन अगदी सहज ओढते. ट्रेनचा वापर केवळ प्रवासासाठीच नाही तर माल वाहतुकीसाठीच केला जातो. ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना अगदी आरामात प्रवास करता येतो.

जेव्हा ट्रेन नव्हती तेव्हा लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक आठवडे लागायचे. पण आता ट्रेनमुळे हे अंतर काही तासांत आपण पार करू शकतो. याच ट्रेनमुळे अनेक गावे आणि शहरे एकमेकांच्या जवळ आली.

गावातील लोक शहरामध्ये येऊ लागले. दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारतात ट्रेन खुप उशीरा आली. भारताच्या विकासात ट्रेनचे खुप मोठे योगदान आहे. एक किलोमीटरचा पल्ला गाठण्यासाठी ट्रेनला किती डिझेल लागते हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

चला तर मग जाणून घेऊया एका लिटर डिझेलमध्ये ट्रेन किती किलोमीटर अंतर पार करते. सध्याच्या बऱ्याच ट्रेन वीजेवर चालतात त्यामुळे डिझेलची बचत होते. पण एका साधारण इंजिनला एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी ४ लिटर डिझेल लागते.

जर ते इंजिन ३००० ते ४००० बीएचपी पावरचे असले तर त्याला एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी १० लिटर डिझेल लागते. ट्रेनचे इंजिन चालू करण्यासाठी खुप मेहनत लागते. तुम्ही बऱ्याच वेळा पाहीले असेल की लोको पायलट अनेकवेळा ट्रेनचे इंजिन चालू ठेऊनच निघून जातो.

त्यामागे हेच कारण आहे की ट्रेनचे इंजिन चालू करण्यासाठी खुप डिझेल वाया जाते. ट्रेनचे इंजिन बंद करणे तर सोपे आहे पण चालू करणे खुप अवघड. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला भेट द्या.

महत्वाच्या बातम्या
म्यानमारची २६ वर्षांची हुकूमशाही मोडून काढली होती ‘या’ मुलीने; भारतातच झाले होते तिचे शिक्षण 
मानसी नाईकचा बेडरूममधला व्हिडीओ झाला व्हायरल, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम
किती ते प्रेम! जेनेलियाने चावला रितेशचा कान, म्हणते प्रेमात पुर्णपणे वेडी झाली आहे; पाहा व्हिडीओ
टोल नाक्यावर गेल्यावर नुसता टोल भरू नका त्याचे फायदेही जाणून घ्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.