किम जोंग उन पडले पुन्हा आजारी; समोर आलेल्या धक्कादायक फोटोंनी उडाली तिथल्या नागरीकांची झोप

गेल्यावर्षी उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांच्या निधनाने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर ते काही दिवसानंतर लोकांसमोर आले होते. पण तेव्हापासून ते कुठल्याही कार्यक्रमात दिसलेले नाही.

उत्तर कोरियाचा सर्व कारभार किम जोंग यांची बहिणच सांभाळते. किम जोंग यांना कुठला तरी आजार असल्याचे म्हटले जात आहे. किम जोंग हे उत्तर कोरियाचे हुकुमशहा आहे. ते अनेकदा लोकांना हैराण करणारे आणि धक्का देणारे निर्णय घेताना दिसून येतात.

किम जोंग यांना त्यांच्या क्रुरतेसाठी ओळखले जाते. ते अनेकदा छोट्या चुकांवरही लोकांना मृत्यु दंडाची शिक्षा देतात. पण सध्या ते आजारी असल्यामुळे ते आता दिसून येत नाही. असे असताना किम जोंग यांचा एका फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये किम जोंग हे खुप थकलेले दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात त्यांचे जवळपास २० किलो वजन कमी झालेले आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांचा सैन्य दलातील अधिकाऱ्यांना अभिवादन करतानाचा फोटो व्हायरल झाला होता.

त्या फोटोमध्ये ते खुप बारीक झाल्याचे दिसून येत होते. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर थकवाही दिसून येत होता. त्यामुळे त्यांना नक्की कोणता आजार झाला आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पण किम जोंग यांच्या प्रकृतीमुळे तिथले सर्वच नागरीक चिंतेत आहे.

सध्या उत्तर कोरिया आर्थिक संकटातून जात आहे. कोरोनामुळे उत्तर कोरियाला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अन्नधान्याचे संकटही त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.जगभरातून सहानुभूती मिळवण्याच्या उद्देशाने हे फोटो जाणून बुजून व्हायरल केले जात असल्याच्याही चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO; बस सावकाश चालवण्यास सांगितल्यानं एस. टी. कर्मचाऱ्यांकडून वयोवृद्ध दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
वहिणी रॉक वऱ्हाडी शॉक! भरलग्नात वहिणीने दिराचा जबरदस्ती हात पकडला अन्…; पहा व्हिडिओ
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेच्या टीमने कोकणवासियांसाठी केली कळकळीची विनंती; व्हिडिओ पाहून येईल डोळ्यात पाणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.