पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबाबत अभिनेत्री दिया मिर्झाचं ट्विट व्हायरल; म्हणते…

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा सोशल मीडियावर आणि आपल्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरते. दिया अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने व्यक्त होत असते. अशाच एका विषयावर दियाने केलेलं ट्विट चांगलच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकताच प्रदूषणाविषयी केलेल्या एका संशोधनाचा लेख सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामध्ये प्रदूषणामुळे पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट छोटा होत असल्याचा दावा केला आहे. याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात अभिनेत्री दिया मिर्जाने ट्विट केले आहे.

दियाने ट्विट करत वाढत्या प्रदुषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधले आहे. एवढच नव्हे तर तिने या संशोधनाचा अहवाल शेअर केला आहे. दियाने ट्विटमध्ये शेअर केलेल्या अहवालात म्हटले आहे, पर्यावरणातील विषारी रसायनामुळे शुक्राणूंची संख्या आणि टेस्टिरकल्सवर याचा परिणाम होऊ शकतो. याचाच परिणाम पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर होत आहे.

याबाबत दियाने तिच्या ट्विटला मिश्कील कॅप्शन दिले आहे. ती म्हणते, कदाचित आता तरी लोक पर्यावरणाबद्दल जागरूक होतील. तिचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दिया निसर्ग, वन्यजीव, प्रदुषणाच्या मुद्द्यांवर भरपूर जागरूक आहे. याआधीही तिने याबदद्ल ट्विट केले आहेत.

दियाने शेअर केलेला अहवाल गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या अहवलात प्रदुषणाचे पुरुषांच्या आणि बालकांच्या गुप्तांगावर कोणते परिणाम होतात, यावर माहिती देण्यात आली आहे. प्रदुषणामुळे नवजात बालकांच्या लैंगिक अवयवांमध्ये दोष आढळत असून अनेक मुलांच्या गुप्तांगाचा आकार हा सामान्य आकारमानापेक्षा कमी असल्याचे आढळले आहे.

महत्वाच्या बातम्या-
लग्नानंतर पहिल्यांदाच दिया मिर्झाने शेअर केले हॉट फोटो, नवऱ्यासोबत करतेय हनीमून एन्जॉय
कुंडली जुळत नसल्याने मोहनलालच्या कुटुंबाने मोडलं लग्न, पण तरीही सुचित्राच बनली त्यांची सुन
फोन टॅपिंग प्रकरण विरोधकांवरच उलटले! सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल; देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीची शक्यता

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.