‘कोंबडी पळाली’ गाण्यावरील डान्स व्हिडिओ सोशल मिडियावर घालतोय धुमाकूळ, पाहा व्हिडिओ

मुंबई | सोशल मिडियावर रोज नवीन व्हिडिओ, फोटो व्हायरल होत असतात. अनेकजणांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून कमी काळात प्रसिध्दी मिळवली आहे. सध्या सोशल मिडियावर एका मराठमोळ्या गाण्यावर परदेशातील व्यक्तीने केलेला डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला ‘जत्रा’ चित्रपट तुम्हाला माहितच असेल. या चित्रपटात अभिनेता भरत जाधव यांनी मुख्य भूमिका साकारली होती. २००६ साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील अजय अतुल यांनी गायलेले ‘कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली’. या गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. हे गाणे वाजू लागल्यानंतर अनेकजण वेड्यासारखे नाचत असतात.

सोशल मिडियावर सध्या या गाण्यावर अमेरिकन व्यक्तीने केलेला डान्सचा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, गाण्यावर त्या व्यक्तीने भन्नाट स्टेप्स केल्या आहेत. त्याचा हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. त्याच्या डान्सचे कौतूक सोशल मिडिया युजर्स करत आहेत.

अभिनेता जितेंद्र जोशी यांनीही हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिलं आहे. ते म्हणतात की, “गाणं लिहिताना अजय-अतुलला म्हणालो होतो की हे गाणं सुपरहिट होईल असं वाटतंय. पण इतकं दुरवर पोहोचल्याची कल्पना नव्हती. अर्थातचं श्रेय अजय अतुलचंच.”

व्हिडिओमध्ये डान्स करणाऱ्या व्यक्तीचं नाव रिकी पाँड आहे. ते अमेरिकेतील मोठे कंटेंट क्रिएटर आहेत. पाँड अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. त्यांनी आतापर्यंत अनेक हिंदी, भोजपुरी गाण्यांवर डान्स केला आहे. डान्सचे व्हिडिओ ते सोशल मिडियावर शेअर करत असतात. त्यांच्यासोबत त्यांची मुलेही डान्स करण्यास साथ देत असतात. रिकी पाँड यांनी भारतीय गाण्यांवर केलेल्या डान्समुळे त्यांचे चाहतेही खुप आहेत.
महत्वाच्या बातम्या-
ऐश्वर्या अभिषेकच्या लग्नाची बातमी ऐकून सलमान खानने दिली होती ‘अशी’ प्रतिक्रिया
जेठालालच्या मुलीला पाहून चाहते झाले पागल; सुंदरतेमध्ये देते बॉलीवूड अभिनेत्रींना टक्कर
तुझ्यात जीव रंगला! साहेबरावच्या आठवणीने राणादा झाला भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.