क्रिकेटचे किट खरेदी करणे देखील अवघड असलेल्या धोनीकडे आज आहेत तब्बल ‘एवढ्या’ गाड्या

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार खेळाडू महेंद्र सिंह धोनीचे आज जगभरात लाखो-करोडो चाहते आहेत. त्याने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण खेळाने जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत.

क्रिकेट विश्वातील या महान खेळाडूने मोठ्या मेहनतीने हे यश मिळवले आहे. साध्या घरातील धोनीने लहानपणी गरिबीत दिवस काढले आहेत.

छत्तीगडच्या रांचीमध्ये बालपण घालवलेल्या महेंद्रसिंह धोनीचे वडील एक साधी नोकरी करीत होते. त्या काळात धोनीला क्रिकेटचे किट खरेदी करने देखील अवघड होते. रांचीच्या याच घरात धोनीचे बालपण गेले.

धोनी बाईक्सचा शौकिन आहे. त्याच्याकडे २३ बाईक्स असल्याचे सांगितले जाते. अनेकदा तो वेगवेगळ्या बाईक्सवरुन प्रवास करताना दिसून आला आहे.

त्याच्याकडील २३ बाईक्सपैकी १० स्पोर्ट्स आणि १३ विंटेज बाईक आहेत. त्याच्या गाड्यांची सगळी देखभाल तो स्वता करत असतो.

धोनीजवळ हमर ऑडी Q7, लँड रोव्हर फ्रीलेंडर, GMC Sierra, Ferrari 599, Mitsubishi Qutlader, पजेरो SFX, टोयोटा करोला, कस्टम बिल्ट स्कॉर्पियो अशा करोडोंच्या कार्सही आहेत.

आज धोनीजवळ काय नाही हे सांगण्याची गरजच नाही. त्याच्याकडे आज करोडो रुपयांच्या बाईक, कार्स आणि आलिशान घरं आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.