भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी(MS Dhoni) याने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण अजून देखील महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. महेंद्रसिंग धोनी आता फक्त आयपीएलमध्येच खेळतो. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा तो कर्णधार आहे.(dhoni told story about jersy number 7)
महेंद्रसिंग धोनीच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होत असते. आता महेंद्रसिंग धोनीची जर्सी चर्चेत आली आहे. प्रत्येक खेळाडूसाठी त्यांचे जर्सी क्रमांक खूप खास असतात. म्हणून प्रत्येक खेळाडू आपल्या आवडीने जर्सी क्रमांक निवडतो. महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा जर्सी क्रमांक १० नंबर होता. तसेच धोनीचा जर्सी क्रमांक ७ आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या जर्सीचा नंबर देखील खूप प्रसिद्ध झाला आहे. पण, महेंद्रसिंग धोनी ७ क्रमांकाची जर्सी का घालतो? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमीच पडतो. यावर अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळी करणे दिली आहेत. पण आत खुद्द महेंद्रसिंग धोनी या जर्सी नंबर मागची कथा सांगितली आहे. एका कार्यक्रमामध्ये धोनीने याबद्दल खुलासा केला आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्या कार्यक्रमात म्हणाला की, “‘बर्याच लोकांना वाटतं की ७ हा माझा लकी नंबर आहे. पण मी हा नंबर कोणत्याही खास कारणासाठी निवडला नाही. माझा जन्म ७ जुलैला म्हणजेच सातव्या महिन्याच्या 7 व्या दिवशी झाला, हे एकमेव कारण यामागे आहे”, असे धोनीने सांगितले.
महेंद्रसिंग धोनी आता तीच ७ नंबरची जर्सी घालून चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. २६ मार्चपासून आयपीएलच्या १५ व्या हंगामाची सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये होणार आहे.
यंदाच्या हंगामात आयपीएलमध्ये दोन नवीन संघ देखील दाखल झाले आहेत. त्यामुळे जगभरातील क्रिकेट रसिकांना जबरदस्त थरार पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आयपीएलच्या या हंगामातील सर्व उपांत्यफेरी पर्यंतचे सामने महाराष्ट्रात खेळवले जाणार आहेत. मुंबई आणि पुण्यामध्ये हे सामने होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
धोनीवर एखादी वाईट वेळ आली तर सर्वात आधी.., सडकून टीका झाल्यानंतर गौतम गंभीरचे मोठे विधान
“शरद पवार पावसात भिजले मात्र न्यूमोनिया भाजपला झाला”
“शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे गोपीचंद पडळकरांना कळून चुकलं आहे”